📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. मधुकर राळेभात यांना खासदार निलेश लंके यांची सांत्वन भेट

प्रा. मधुकर राळेभात यांना खासदार निलेश लंके यांची सांत्वन भेट

जामखेड : येथील ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या निवासस्थानी आज अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी भेट देत त्यांचे सांत्वन केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे(करमाळा),प्रा.अभिमन्यू उगले,माजी सभापती प्रा.संजय वराट,प्रा.लक्ष्मणराव ढेपे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.हर्षल डोके, अमोल लोहकरे,प्रवीण उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रा. मधुकर राळेभात यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या दुःखद प्रसंगी खासदार लंके यांनी राळेभात कुटुंबीयांची भेट घेऊन दिवंगत व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर दिला.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील कै. शाहुराव राळेभात हे काही काळ शासकीय सेवेत कार्यरत होते.घरची शेती असल्याने आजोबांच्या आग्रहाखातर शेती करण्यासाठी गावी आले होते.शेतीकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता, तसेच १९४७ साली ते इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते.असेही त्यांनी सांगितले.

Back to top button