
सोमवारी बाळनाथ महाराज यांच्या पालखीची मिरवणूक होणार…
पालखी मिरवणुकीचा मान पत्रकार अभिजीत पवार, नवनाथ मोरे, उमेश अनवणे, रामेश्वर अनवणे यांना मिळाला..
बीड प्रतिनिधी – महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चाकरवाडी मध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बाळनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आज या सप्ताहाची सांगता होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह मधील सर्व कार्यक्रम हे तापोनिधी गुरुवर्य महादेव महाराज तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सप्ताहाची सांगता ही बाळनाथ महाराज यांच्या पालखी मिरवणुकीने सांगता होणार आहे. या वर्षी पालखी मिरवणुकीचा मान पत्रकार अभिजीत रामेश्वर पवार, नवनाथ पांडुरंग मोरे, उमेश बापुराव अनवणे, रामेश्वर सुग्रीव अनवणे यांना मिळाला आहे.
तसेच बाळनाथ महाराज यांची पालखी ही प्रतिवर्षाप्रमाणे बाळनाथ महाराज पादुका मंदिर ( हनुमान मंदिर ) या ठिकाणाहून माऊली दादा मंदिर तथा बाळनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून बंदेवाडी कडे प्रस्थान होईल या नंतर बंदेवाडी या ठिकाणी लालगिरी महाराज यांच्या समाधी जवळ अभिषेक होऊन त्या नंतर बाळनाथ महाराज यांच्या समाधी स्थळी पालखी पोहचेल.पालखी मिरवणुकी नंतर गुरुवर्य तपोनिधी, शांती ब्रह्म ह. भ. प . महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडीकर ( बाळनाथ माऊली संस्थान ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या होणाऱ्या पालखी मिरवणुकीचा , महाप्रसादाचा, किर्तन श्रावणाचा सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गुरुवर्य तपोनिधी शांती ब्रह्म महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडीकर आणि समस्थ ग्रामस्थ चाकरवाडी कर यांनी केले आहे.



