बीड
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती च्या सचिव पदी सुनील क्षीरसागर यांची निवड

बीड । प्रतिनिधी
अहिल्यानगर – बीड – परळी वैद्यनाथ या रेल्वे मार्गा च्या कामाला गती मिळावी तसेच शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये रेल्वे कामात निर्माण होणे अडथळे प्रशासकीय पातळीवर बैठका घेणे त्याचबरोबर निधी संकल्पसाठी निवेदने सादर करणे यासह अन्य न्याय हक्कासाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या समितीच्या नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी जवाहरलाल सारडा यांची नियुक्ती झालेली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( दि. 25 ) बैठक संपन्न झाली.या बैठकीत सर्वानुमते दैनिक चंपावती पत्र चे संपादक सुनील नामदेवराव क्षीरसागर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती जिल्हा बीड ची बीड शहरामध्ये समितीचे सदस्य अरुण डाके यांचे निवासस्थानी बुधवारी बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष जवाहरलाल सारडा, सचिव सुनील क्षीरसागर, शांतीलाल पटेल, विष्णुदास बियाणी, रामचंद्र जोशी, अशोक म. शेटे, शिवाजी बन्सी जाधव, सय्यद नवीदुजम्मा, रवी उबाळे, अरुण बाबासाहेब डाके, महम्मद लईक अहेमद, भास्करराव जाधव, तुकाराम साळुंके, विलासराव बडगे, वाय जनार्दन राव, सखाराम मस्के, वैभव स्वामी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नगर – बीड – परळी या जिव्हाळ्याच्या रेल्वे मार्गासाठी दैनिक चंपावती पत्र चे संपादक स्व. नामदेवराव क्षीरसागर यांनी लेखणीच्या माध्यमातूनच स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती जिल्हा बीड माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलनासह प्रशासकीय पातळीवर देखील भरीव कामगिरी करत बीडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य केले होते. या बैठकीमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करत उपस्थित त्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत आणि समितीच्या आजपर्यंतच्या कार्याचा अनुभव असणारे त्यांचे चिरंजीव दैनिक चंपावती पत्र चे संपादक सुनील नामदेवराव क्षीरसागर यांची सचिव पदी नियुक्ती करण्याचा ठराव मांडण्यात आला. यासाठी समितीचे सदस्य विलासराव बडगे यांनी ठराव मांडला यास अरुण डाके आणि वाय जनार्दन राव यांनी अनुमोदन देत सर्वानुमते ठराव पास करत सचिव पदी सुनील नामदेव क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल उपस्थितांनी सुनीलराव क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
—–
गतीने कामकाज केले जाईल : सुनील क्षीरसागर
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी दैनिक चंपावती पत्र ची स्थापना 1965 मध्ये स्व नामदेवराव क्षीरसागर म्हणजेच माझे वडील यांनी केली. जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक राजकीय विकास सर्वच पातळीवर दैनिक चंपावती पत्र या माध्यमातून माझ्या वडिलांनी लेखणी च्या बळावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. दरम्यान बीडकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती जिल्हा बीड ची स्थापना केली 1983 पासून या समितीच्या माध्यमातून त्यांनी रेल्वे कामाच्या प्रगतीसाठी पाठपुरावा वेळप्रसंगी आंदोलनात देखील सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्याच या कार्याची दखल आणि त्यांच्या समवेत केलेल्या कामाचा माझा अनुभव पाहता समितीने सचिव पदी निवड केली येणार्या काळातही त्याच ताकतीने आणि गतीने समितीचे कामकाज केले जाईल अशी ग्वाही सचिव पदी निवड झाल्याबद्दल सुनीलराव क्षीरसागर यांनी दिली. यावेळी त्यांनी सचिव पदी निवड केल्याबद्दल सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानले.