बीड

आ.रोहीत पवार यांनी संधी दिल्यास नगरसेवक पदाची निवडणूक प्रभाग क्र.02 मधुन लढविणार – मा.पांडुरंग माने

आ.रोहीत पवार यांनी संधी दिल्यास नगरसेवक पदाची निवडणूक प्रभाग क्र.02 मधुन लढविणार – मा.पांडुरंग माने

जामखेड प्रतिनिधी:-जामखेड शहरातील सामाजिक क्षेत्रात काय कार्यरत असे व्यक्तिमत्व मा.पांडुरंग माने येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.02 मधुन नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. आ. रोहित पवार यांनी संधी दिली तर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणार आहेत. तसेच नगरसेवक झाल्यास तरुणांना रोजगार, आरोग्यसेवा,व प्रभाग क्र.02 आणि शहराच्या भागात विकास करुन चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत मा.पांडुरंग माने यांनी व्यक्त केले.

सुशिक्षित तरूणांनी एकत्र येत समाजाच्या उन्नतीसाठी वज्रमूठ बांधुन प्रभागाचा व शहराचा सर्वांगीण विकास करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 02 तसेच जामखेड शहर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे रस्ते, वीज, पाणी आरोग्य, स्वच्छता अशा मुलभूत सुविधांचाही आभाव प्रभाग क्रमांक 02 व शहरातील असंख्य भागात प्रश्न जाणवत आहे. मा.पांडुरंग माने नगरसेवक झाल्यास आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून लवकरच एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावुन तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहेत. फक्त एका प्रभागापुरते न पहाता संपुर्ण जामखेड शहराचा विकास कसा होईल हे पहाण्यात येईल.

“सुरुवात परिवर्तनाची- नव्या पर्वाची!
जामखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक 02 मा.पांडुरंग माने एक सुक्षिक्षित व सुसंस्कृत चेहरा असल्याने तरुणांची फळी उभी करुन प्रभाग व जामखेड शहराचा विकास करण्याचा मानस आहे. यामध्ये प्रथम प्रभाग क्रमांक 02 आणि शहरातील सुक्षिक्षित तरुण व एकल महीलांच्या हाताला काम कसे उपलब्ध होईल हे प्रामुख्याने पहाण्यात येईल. आ. रोहित पवार यांनी नगरसेवक पदाची उमेदवारी दिल्यास सक्षमपणे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असे देखील मा.पांडुरंग माने यांनी सांगितले.

आ.रोहित पवार व खा. निलेश लंके हे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असुन विकासाचे व्हिजन असणारे नेते आहेत. आ. रोहित पवारांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. आणि आ. रोहित पवार हे आपल्या तरुण तडफदार युवकांचा आयडाॅल असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली तरूणांची फळी राजकारणात एकत्र करून जामखेड शहराचा विकास घडवु या अशी भावना NCP-SP विभाग प्रमुख:- मा.पांडुरंग माने यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button