मुंबई

अस्लिम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर,कॉल रेकॉर्ड चेक करा

 

काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि काशिफचे काय संबंध आहेत हे उघड झालं. पाहिजे. अस्लम शेख यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नवे गौप्यस्फोट केले. त्यानंतर मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

अस्लम शेख यांना काशिफ खान वारंवार पार्टीला बोलावत होता. ओळख नसलेला माणूस एकदा अमंत्रित करेल, ओळख असल्याशिवया वारंवार कसे बोलावेल? एका कॅबिनेट मिनिस्टरला अनोळखी माणूस वारंवार फोर्स कसा करू शकतो? असा सवाल करतानाच अस्लम शेख यांचे कॉल रिकॉर्ड चेक केले पाहिजे. नवाब मलिकांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. अस्लम शेखचाही काशिफ सोबत संबंध होते त्यांचेही कॉल रेकॉर्ड चेक झाले पाहिजे. अस्लम शेख आणि काशिफ खानचे संबंध होते हा माझा आरोप नाही. नवाब मलिक यांचा आहे. मी फक्त कोण मंत्री यात आहे असं मी विचारलं होतं? मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मलिक यांनीच नाव घेतलं, असं कंबोज म्हणले.

अनेक बड्या नेत्यांच्या मुलांना काशिफ खानने पार्टीत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. किती वेळा हे निमंत्रण दिलं? या मुलांसोबत काशिफची कुठे बैठक झाली? काशिफ खानचे आणि या नेत्यांच्या मुलांचे काय संबंध आहेत? याचीही चौकशी झाली पाहिजे. बरं झालं मलिक यांनीच ही माहिती उघड केली. आता सर्वच बाहेर येईल, असंही कंबोज म्हणाले. राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत याची माहिती मलिक यांना द्यावी लागेल. कारण मलिक यांची ही जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले.

Back to top button