जामखेड शहराला वाली कोण? चिखल आणि मोकाट जनावरांचा उपद्रव; नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

जामखेड शहराला वाली कोण?
चिखल आणि मोकाट जनावरांचा उपद्रव; नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
दै. सुर्योदय अपडेट – जामखेड शहरातील रस्त्यांवर सध्या चिखल आणि मोकाट जनावरांचा मोठा उपद्रव दिसून येत असून नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. गल्लीबोळांपासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत चिखल साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, मोकाट जनावरे मुक्तपणे रस्त्यावर फिरत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे.
तपनेश्वर रोड, मिलिंद नगर, कान्होपात्रा नगर (हाडुळा), कुंभारतळे, खर्डा चौक, जयहिंद चौक,विश्वक्रांती चौक, बाजारतळ (भाजी मंडई),महाराष्ट्र बँक रोड, पोकळे वस्ति, मराठी शाळा (संताजी नगर) , शिवाजी नगर,मोरे वस्ति रोड,रसाळ नगर,नुराणी कॉलनीसह अनेक भागांतील रस्ते चिखलमय झाले आहेत. वाहनचालक आणि पादचारी दोघेही मोकाट जनावरांमुळे मोठ्या संकटात आहेत. अचानक जनावर रस्त्यावर येऊन अपघात घडण्याची भीती वाढली आहे.जामखेड नगर परिषदेकडे नियोजन नाही.असेही नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड डॉ अरुण जाधव म्हणाले, अधिकाऱ्यावरचा राजकीय लोकांचा दबाव संपलेला आहे.अधिकारी पुढाऱ्यांना जुमानत नाहीत.त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत.
चौकट
*”राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचलेला असून अशावेळी रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत आहे यामुळे नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी या रस्त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील गल्लीबोळांतील स्थितीकडेही लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.*



