बीड

१ मे कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा..

१ मे कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा..

अप्पर आयुक्त महसूल यांचे अप्पर आयुक्त नाशिक यांना आदेश !

अहिल्यानगर:-एक मे कामगार दिनानिमित्त पाथर्डी पंचायत समितीतील ध्वजारोहणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करा असे आदेश अप्पर आयुक्त महसूल यांचे अप्पर आयुक्त नाशिक (विकास अस्था) यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अधिकार महासंघाने मुख्यमंत्री सचिवालया कडे ध्वजारोहणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तक्रार केली होती.
अहिल्यानगर माहिती अधिकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जायभाये यांनी मुख्यमंत्री सचिवालय कडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एक मे रोजी कामगार दिनानिमित्त पाथर्डी पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण केले जाते या ध्वजारोहणास पाथर्डी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी या झेंडावंदनाच्या कार्यक्रमास झेंड्याला मानवंदना देण्यासाठी गैरहजर राहिले, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री सचिवलयाकडे केली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने अप्पर आयुक्त महसूल यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

चौकट
पाथर्डी पंचायत समितीतील ध्वजारोहणास जे सहा कर्मचारी गैरहजर होते त्यांना याबाबत खुलासा मागवला होता. त्यातील फक्त एका कर्मचाऱ्याचा खुलासा प्राप्त झाला आहे.

शिवाजी कांबळे,
गटविकास अधिकारी, पाथर्डी पंचायत समिती

Back to top button