बीड
निर्लज्ज नगरपरिषद प्रशासनाची गुड मॉर्निंग ग्रुपने लाज राखली ; छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील तुटलेल्या जिमच्या साहित्याची स्वखर्चाने दुरुस्ती :- डॉ.गणेश ढवळे

निर्लज्ज नगरपरिषद प्रशासनाची गुड मॉर्निंग ग्रुपने लाज राखली ; छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील तुटलेल्या जिमच्या साहित्याची स्वखर्चाने दुरुस्ती :- डॉ.गणेश ढवळे
—–
बीड:- ( दि.२५ ) बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणांवर सकाळी आणि सायंकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाने बसवलेले साहित्य मोडकळीस आले होते यामुळे व्यायाम करणारांची हेळसांड होत होती. मोडकळीस आलेल्या जिमच्या साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासकीय ध्वजारोहणा साठी आलेले क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले होते. निवेदन अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नरेंद्र कुलकर्णी यांनी मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत लेखी कळवले होते. मात्र नेहमीप्रमाणेच नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची हेळसांड लक्षात घेऊन “गुड मॉर्निंग ” ग्रुपच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत आणि स्वखर्चाने सगळ्या साहित्यांची दुरुस्ती करून घेतली.त्यामुळे एकंदरीतच निर्लज्ज नगरपरिषद प्रशासनाची गुड मॉर्निंग ग्रुपने लाज राखली अशी प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे यांनी दिली. गुड मॉर्निंग ग्रुपच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सविस्तर माहितीस्तव
—-
बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर सकाळी आणि सायंकाळी नागरीकांची गर्दी असते.व्यायामाच्या दृष्टीने अनेक नागरिक याठिकाणी येतात.अशा नागरीकांसाठी व्यायाम करण्यासाठी काही वर्षापुर्वी ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले होते. या साहित्याची कित्येक महिन्यांपासून मोडतोड झालेली होती.अनेक साहित्य मोडकळीस आलेले होते. त्यामुळे व्यायामासाठी आलेल्या नागरीकांची हेळसांड होत होती.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या सहका-यांनी नगरपरिषद प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन तसेच आंदोलनाद्वारे मोडकळीस आलेल्या साहित्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती.मात्र नगरपरिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. गुड गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने तुटलेल्या जिमच्या साहित्याची वेल्डिंगने दुरुस्ती केली.यासाठी अँड.चंदुभाऊ जटाळ, जयदत्त थोटे,शरद जवळकर, अँड.शिवाजी साळवे,राजुशेठ गोरे, घोगरे , संतोष पवार, दिनेश गुरखुदे, जितेंद्र कासट, आनंद बाहेती, किशोर कागदे,अलीमभाई, सुर्यवंशी, ढाकणे, अंकुश निर्मळ, अशोक सुरवसे, वानखेडे, मुकेश भस्मारे, कोठारी, मिसाळ,बाळु निकम,असत पटेल,राजु दळवी यांनी मोलाचे योगदान दिले.



