बीड
१६ वर्षानंतर सुदर्शन विद्यालय सांगवी पाटणचे माजी विद्यार्थी एकत्र येत स्नेहमेळावा संपन्न..

१६ वर्षानंतर सुदर्शन विद्यालय सांगवी पाटणचे माजी विद्यार्थी एकत्र येत स्नेहमेळावा संपन्न..
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील २००९ सालचे दहावी वर्गातील माजी विद्यार्थी एकत्र येत व आपल्या वेळेतील शिक्षकांनाही कार्यक्रमासाठी बोलवत १६ वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे १६ वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेमध्ये दहावीचा वर्ग भरला होता. कार्यक्रम प्रसंगी प्रथम प्रमुख पाहुणे व शिक्षकवृंद , विद्यार्थी यांच्या उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विशेष म्हणजे त्यावेळचे वर्गशिक्षक सूर्यवंशी सर यांनी वर्गात हजेरी घेतली यावेळी मुलं व मुली मिळून ३५ विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळत होता.
आष्टी तालुक्यातील सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण येथील २००९ सालच्या दहावीच्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी १०ते दुपारी २ वाजे पर्यंत एकत्र येत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
स्नेह मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक दिंडे सर हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रसिध्द उद्योजक पांडुरंग सोनवणे, मा. सभापती शत्रुघ्न मरकड , सरपंच दत्तात्रय खोटे तसेच शिक्षकवृंद मुख्याध्यापक बोडखे सर,सूर्यवंशी सर,गवारे सर, तोरडमल सर,ढोले सर, बोडखे सर, शेलार सर, हाके सर, बांगर सर, झगडे सर, मरकड सर, जाधव सर, शिपाई बाबुराव खिलारे हे शिक्षकवृंद उपस्थित होते. हा स्नेह मेळावा सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाची मेजवानी देत आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून जुनी आठवण म्हणून सुदर्शन विद्यालय या शाळेला भेटवस्तू देण्यात आली.
या स्नेह मेळाव्यासाठी २००९ सालचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शेख यांनी केले .यावेळी माजी विद्यार्थी, प्रमुख पाहुणे व शिक्षकांनी आपले मनोगत, कविता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी हे शासकीय सेवेत वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, समाजकारण, राजकारणामध्ये, यशस्वी झाले असल्याचा आनंद यावेळी शिक्षकांनी व्यक्त केला तर १६ वर्षानंतर जुन्या मित्रांची एकत्र भेट झाल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंद ओसंडून वाहत होता



