📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जामखेड येथील एच् यु गुगळे क्लाॅथ मर्चंट येथे रमजान महोत्सवाचे आयोजन

जामखेड येथील एच् यु गुगळे क्लाॅथ मर्चंट येथे रमजान महोत्सवाचे आयोजन

दि. ८ ते १० मार्च २०२५ कपड्यांचे भव्य प्रदर्शन
, ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा

जामखेड प्रतिनिधी:- जामखेडसह राज्यात कपड उद्योगात प्रसिद्ध असलेल्या एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंटच्या दालनामध्ये( शाखा – मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज पेठ)येथे रमजान ईद निमित्ताने खास ग्राहकांच्या आग्रहास्तव रमजान महोत्सवाचे आयोजन यामध्ये कपड्यांचे भव्य प्रदर्शन व विक्री दि. ८,९ व १० मार्च २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कापड उद्योगात नावाजलेले नाव म्हणून एच यु गुगळे यांच्याकडे पाहिले जाते. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कपड्यांची क्वालिटी आणि अल्प दरात सामान्य लोकांसाठी मनमुराद खरेदी करता यावी यासाठी मान्सून सेल लावला आहे. कापड क्षेत्रात एच यु गुगळे हे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत. एच यु गुगळे या दालनात सालाबादप्रमाणे याही वर्षी ८ ते १० मार्च २०२५ रोजी पर्यंत खास रमजान महोत्सवाचे आयोजन केले आहे.

रमजान ईद निमित्ताने खास मागवण्यात आलेला कपड्याचा संपूर्ण नवीन स्टॉक हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल, ज्यामध्ये साडी, पंजाबी ड्रेसेस, लहान मुलांचे रेडीमेड कपडे आणि पुरुषांच्या रेडीमेड कपड्यांमध्ये असंख्य व्हारायटी पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना पसंत असलेला माल अॅडव्हान्स देवून बुकिंग सुद्धा करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी या तीन दिवसांमध्ये मेन रोड शाखेला सहपरिवार तसेच मित्रांसोबत भेट देऊन लवकरात- लवकर आपल्या आवडीच्या मनमोहक नवनवीन वस्त्रांच्या खरेदीचा आनंद घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button