संपादकीय

पती भाड्यानं आणला आहेस का? अभिजीत बिचुकलेच्या प्रश्नानं चिडली राखी सावंत

 

मुंबई | ‘बिग बॉस’च्या घरात कशावरून राडा होणार, हे सांगता यायचं नाही. ‘बिग बॉस 15’मध्ये सध्या रोज नवे राडे सुरू आहेत. अभिजीत बिचुकले , रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, राखी सावंत आणि तिचा पती रितेश असे पाच जण शोमध्ये आल्यापासून घरातलं वातावरण पेटलं आहे. आता काय तर राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले यांच्यात जबरदस्त भांडण झालं. अगदी राखीनं रौद्रावतार धारण केला.

ताज्या व्हिडीओत राखी व बिचुकले दोघे भांडताना दिसत आहेत. होय, राखीच्या पतीवर बिचुकलेनं अशी काही कमेंट केली की, राखी भडकली. तिला राग अनावर झाला. राखी, पती भाड्यानं आणला आहेस का? असा प्रश्न बिचुकले उठतो आणि राखीचा राग अनावर होतो. ती इतकी संतापते की, अगदी बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीची तोडफोड सुरू करत सुटते.

बिचुकलेचे केस खेचताना दिसतेय. सलमान भाईने पण तुला हेच विचारलं होतं,असं बिचुकले म्हणतो. यावर, भाईने कधीच माझ्या पतीला भाड्याचा पती म्हटलं नाही.तू असशील भाड्याचा टट्टू, तुझी बायको असेल भाड्याची, असं राखी म्हणते.

Back to top button