बीड
परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर प्रकरणी चौकशी समिती गठीत करा,

परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर प्रकरणी चौकशी समिती गठीत करा,
सय्यद सलीम बापू यांची मागणी
बीड / प्रतिनिधी:-परळी येथील ऐतिहासिक दर्गा नासर जंग प्रकरणी विशेष चौकशी समिती गठींकरून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केली आहे.
असे की,परळी येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत येणारी ऐतिहासिक देवस्थान नासर जंग दर्गा असून सदरील दर्गेला खिदमत माश एकूण 178 एकर इनामी जमीन आहे.गेल्या काही वर्षांपासून सदरील देवस्थान मिळकतीवर येथील स्थानिक भूमाफिया यांचा डोळा असून ते सतत देवस्थान इनामी जमीन लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. ऐतिहासिक दर्गा नासर जंगच्या मिळकतीवर अतिक्रमण करून टोले जंग इमारती बांधली जात असून सदरील मिळकतीच्या बोगस फेरफार करून पी.टी.आर व पी.आर कार्ड सुद्धा देण्यात आले आहे.तरी या प्रकरणी आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन प्रकरण उघडगीस आणण्याचे काम केले आहे.
येथील भूमाफिया यांनी परळी नगरपरिषद येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे ऐतिहासिक व पुरातत्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केले.याप्रकरणी मी स्वतः परळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना कॉल करून सदरील प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ऐतिहासिक पुरावे का नष्ट केली जात आहे ? असे प्रश्न विचारले असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली.व त्यानंतर मी वक्फ मंडळाचे मुख्य अधिकारी यांना कॉल करून सदरील प्रकरणाची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ जिल्हा वक्फ अधिकारी यांना प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार असल्याची माहिती दिली. तरी सद्यस्थितीत जिल्हा वक्फ अधिकारी यांनी सदरील प्रकरणात कोणतीही कायदेशीर कार्यवाही केलेली नाही.
तरी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाअंतर्गत येणाऱ्या ऐतिहासिक दर्गा नासर जंगचे ऐतिहासिक व परतत्व पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न हे अत्यंत गंभीर असून हे सर्व प्रकार परळी येथे भूमाफिया,तलाठी,मंडळ,अधिकारी,तालुका निबंध आणि परळी नगर परिषद येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने होत आहे.या प्रकरणी विशेष चौकशी समिती गठीत करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा येत्या 18 ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदादा मरण उपोषण करण्यात येईल असे आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.यावेळी एड.सय्यद अल्ताफ, सय्यद इलियास भाई व समीर सिद्धीकी सह आंबेडकरी विचार मोर्चाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



