जिजाऊंचे नाव शॉपिंग कॉम्प्लेक्सला द्या : मनसेची नगर परिषदेकडे मागणी

जिजाऊंचे नाव शॉपिंग कॉम्प्लेक्सला द्या : मनसेची नगर परिषदेकडे मागणी
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड नगर परिषदेमार्फत शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला राजमाता जिजाऊ शॉपिंग कॉम्प्लेक्स असे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष श्री. प्रदीप टापरे,शहर उपाध्यक्ष श्री. अनिल पाटील,श्री.आकाश साठे,श्री.भाऊसाहेब पोटफोडे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य, न्याय आणि स्वाभिमानाचे धडे दिले. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्सचे नामकरण झाल्यास जामखेड शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ मिळेल.
तसेच नागरिकांमध्ये आदर्श विचारांची जपणूक होण्यास मदत होईल, असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



