जामखेड येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीराम कथा’ व हरिकीर्तनाचे आयोजन

जामखेड येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीराम कथा’ व हरिकीर्तनाचे आयोजन
जामखेड- जामखेड शहरातील श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समिती, जामखेड यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीराम कथा’ आणि श्रीहरिकीर्तन ह.भ.प.विजयकुमार बागडे महाराज यांचे होणार असून रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘श्रीराम कथा’ या धार्मिक प्रवचनमालेचे आयोजन गुरूवार, दि. ३ एप्रिल ते शनिवार, दि. ५ एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये श्री सदानंद बाळकृष्ण होशिंग हे ‘चिरे आम्ही पायातले’ या विषयावर प्रवचन सादर करणार आहेत. संध्याकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत हे प्रवचन होणार आहे.
तसेच ‘श्रीराम नवमी’ निमित्त रविवार, दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह.भ.प. विजयकुमार बागडे महाराज (सर) यांचे सुश्राव्य श्रीहरिकीर्तन होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचा श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समिती, जामखेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



