📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे

पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे
—
लिंबागणेश:- ( दि.२४ ) जम्मू -काश्मिरच्या पहलगाम मधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखले जाणारे ” बैसरण खोरे” येथील निसर्गरम्य परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर पाक धार्जिणे अतिरेक्यांनी बेछुटपणे गोळीबार करत हल्ला केला.या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटक मृत्युमुखी पडले असुन अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२४ गुरुवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.यावेळी हिंदू -मुस्लिम भाई भाई म्हणत “पाकिस्तान मुर्दाबाद” हल्लेखोरांना फाशी द्या ” पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. हल्लेखोर आणि त्यामागील सुत्रधार यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आली. भारत सरकारने पाकिस्तान विरोधात घेतलेल्या सिंधू पाणी वाटप करार रद्द,अटारी सिमेवरील तपास नाका बंद, पाकिस्तानी नागरीकांना व्हिसा नाही, उच्चायुक्तालयातील लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागार पदे रिक्त आदी निर्णयांचे स्वागत करण्यात आले.यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, भिम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ, अँड . गणेश वाणी,अशोकराजे वाणी ,महादेव कुदळे,शेख शफीभाऊ, समीर शेख,कैलास काटे, बालाजी निर्मळ,शंकर निर्मळ, हरिओम क्षीरसागर, सुरेश निर्मळ,कचरू रणखांब, अमोल वक्ते, भगवान मोरे,आश्रुबा गिरे, संतोष भोसले, नाना वाणी, जनार्दन वाणी, राजेंद्र वायभट आदी ग्रामस्थ सहभागी होते.

Back to top button