बीड

पंचक्रोशी विद्यालयात ‘पंच(भाऊ) पुस्तक महावाचन’ उपक्रम उत्साहात संपन्न

पंचक्रोशी विद्यालयात ‘पंच(भाऊ) पुस्तक महावाचन’ उपक्रम उत्साहात संपन्न

“संस्काराला उशीर झाला तर सावरणं अवघड!” – तेजस्वीनी शिंदेचा प्रभावी विचार

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल – लेखक एकनाथ चव्हाण

150 विद्यार्थ्यांनी घेतला सामूहिक वाचनाचा अनुभव

जामखेड (प्रतिनिधी) : पंचक्रोशी विद्यालय, नायगाव येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘पंच(भाऊ) पुस्तक महावाचन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी तब्बल 150 विद्यार्थ्यांनी एकत्र पुस्तक वाचत वाचन संस्कृतीला चालना दिली.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक उगले सर, लेखक एकनाथ चव्हाण,टेकाळे सर, नागरे सर, बोंडगे सर, कोरे सर, शेकडे मॅडम, बोराटे सर, घोडके सर व कवडे मामा यांची उपस्थिती लाभली. शिक्षक व मान्यवरांनी पुस्तकातील विचारांवर मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली.

यावेळी विद्यार्थिनी अंजली गायकवाड, सारिका फाळके, तेजस्वीनी शिंदे यांनीही पुस्तकावर विचार मांडले. विशेषतः तेजस्वीनी शिंदे हिच्या – “पेरणीला उशीर झाला तर धान उशीरा येईल, पण संस्काराला उशीर झाला तर सावरणं खूप अवघड असतं” या विचाराने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यास मदत करणारा ठरला असून, शाळेच्या वाचनसंस्कृती वाढीसाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे शिक्षकांनी मत व्यक्त केले.

*लेखक एकनाथ (दादा) चव्हाण यांची प्रतिक्रिया:*

” विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी दिलेले उपाय उपयुक्त वाटतात. वाचनालयाचा उपयोग, वाचन स्पर्धा, डिजिटल वाचन यांसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्यासाठी प्रभावी ठरतील. पालक आणि शिक्षकांनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हा लेख वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रेरणादायी आहे.

*लेखक एकनाथ (दादा) चव्हाण*

Back to top button