📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या कटाचा जाहीर निषेध – बीड जिल्हा शाखा

पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे यांना जीवे मारण्याच्या कटाचा जाहीर निषेध – बीड जिल्हा शाखा
गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक तथा दैनिक जनसुराज्यचे मुख्य संपादक संजय भोकरे साहेब यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या तिघांना सांगली येथील घराजवळ पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भ्याड प्रकाराचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव विवेक स्वामी यांनी म्हटले आहे की, पत्रकारांवर होणारे हल्ले आणि धमक्या ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असून सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांच्या पाठीशी नेमकी कोणाची ताकद आहे, याचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
“जर या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधारांना समोर आणले नाही, तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्यभर तीव्र आंदोलन छेडून न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही संघटनेने दिला आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून शासन व प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
चौकट
राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच संकट निर्माण होत असल्याची चिंता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे गेवराई तालुकाध्यक्ष अंकुश रामराव आतकरे यांनी व्यक्त परत पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकार हे समाजातील सत्य घटनांना वाचा फोडण्याचे काम करत असतात. सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका पत्रकार पार पाडतात. मात्र अलीकडील काळात पत्रकारांना धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे तसेच जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आतकरे यांनी सांगितले.
Back to top button