बीड

नांदूर घाट जि प शाळा वाचवण्यासाठी अमोल जाधव चे आत्मदहन यावर तोडगा काढा नसता याचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन तालुका भर छेडले जाईल — शंकर जाधव

नांदूर घाट जि प शाळा वाचवण्यासाठी अमोल जाधव चे आत्मदहन यावर तोडगा काढा नसता याचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन तालुका भर छेडले जाईल — शंकर जाधव
   नांदुर घाट जिल्हा परिषद शाळेसाठी मागील 18 महिन्यांपासून शाळा समितीचे अध्यक्ष अमोल जाधव लढा देत आहेत शासनाची शाळा वाचवण्यासाठी जो लढा उभा करून संघर्ष सुरू आहे तो राज्यात पहिलाच असेल एवढा संघर्ष एक सामान्य शेतकरी व शाळा समितीचा अध्यक्ष लढतोय अशावेळी शासनाने पाठबळ दिले पाहिजे कारण शासनाला जे काम करायचे आहेत ते काम शाळा समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ करत आहेत महत्वाचे म्हणजे शासनाचे धोरण पहिली ते पाचवी आहे तरीदेखील नांदूरच्या शाळेला पाचवीच्या वर्गाला विरोध केला जात आहे संस्थेचे लाड पुरवण्यासाठी गावाचा आत्मा जिल्हा परिषद शाळा आहे व या ठिकाणी पहिली ते सातवी जुनी शाळा होती नवीन मान्यता मागितलीच नाही अध्यक्ष अमोल जाधव यांनी बीडमध्ये दोन वेळेस जिल्हा परिषद सिओ कार्यालय शाळा भरवली उपोषण केले फक्त क्षणिक आश्वासन देत होते शेवटी अध्यक्ष यांनी टोकाचे पाऊल घेऊन 14 जून रोजी आत्मदहनाचा इशारा दिला तरी प्रशासनाने आधीच तोडगा काढून काही चुकीची घटना घडण्याच्या आत न्याय द्यावा नसता काही बरे वाईट घडले तर याचे तीव्र पडसाद उमटतील व तालुका भर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभा केले जाईल व याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे तालुका अध्यक्ष शंकर जाधव यांनी पत्रकार द्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे.
      या ठिकाणी गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांना प्रशासनाला शिकून द्यायचे नाही का हजारो रुपयाची फीस पहिलीपासून कुठे भरणार हा लढा आता येत्या अमोल जाधवचा नसून पूर्ण गावाचा पूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पालकांचा व सर्वसामान्यांचा झाला आहे व अमोल जाधव यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच कष्टकरी शेतकरी पालक हे तालुक्यातील आहेत भविष्यात काही घटना घडली तर याचे परिणाम खूप मोठे भोगावे लागतील त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी नसता प्रत्येक ठिकाणी मोठे आंदोलन उभा राहील असे तालुकाध्यक्ष शंकर जाधव यांनी म्हटले आहे
Back to top button