बीड
जामखेडवरून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना भगवे झेंडे फडकवत जामखेडकरांचा ‘चलो मुंबई’ नारा

जामखेडवरून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना
भगवे झेंडे फडकवत जामखेडकरांचा ‘चलो मुंबई’ नारा
जरांगे पाटलांच्या हाकेला, जामखेड ची ऐतिहासिक साथ
जामखेड दि.२७ – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी संघर्षाचे हत्यार उचललेले मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या हाकेला जामखेड तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बुधवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून वाजतगाजत, भगवे झेंडे फडकवत भव्य मिरवणुकीसह मराठा बांधव मुंबईकडे मार्गस्थ झाले.
जामखेडमधील भटके विमुक्त, दलित, मुस्लिम व धनगर समाजबांधवांनी या लढ्याला साथ देत मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर आंदोलनाला पाठिंबा दर्शवत होते.तालुक्यातील प्रत्येक गावातून तीन ते चार वाहने निघावीत, यासाठी मागील काही दिवसांपासून बैठका घेतल्या गेल्या. ग्रामस्थांनी आर्थिक मदत उभी करून या लढ्याला हातभार लावला आहे.विंचरणा नदीकाठावरील शंकर मूर्ती परिसरात मिरवणूक पोहोचताच दलित, धनगर, मुस्लिम व भटके विमुक्त समाजातील नेत्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. मुंबईच्या लढ्यात आम्हीही खांद्याला खांदा लावून उभे राहणार,असा जाहीर उच्चार त्यांनी केला.
चौकट
मराठा आरक्षणाची ठिकठिकाणी बॅनरबाजी
————————————–
चलो मुंबई आंदोलनाची लाट आता ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कोपऱ्यात पोहोचली आहे. जामखेड शहरातील चौका चौकात देखील चलो मुंबई, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण, गरजवंत मराठ्यांचा लढा, २९ ऑगस्ट रोजी भगवं वादळ मंबईत धडकणार अशा नावाने बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. हे फक्त बॅनर नसुन मराठा समाजाच्या हक्काची आणि सन्मानाची गर्जना आहे! असे देखील यावेळी मराठा बांधवांन कडुन सांगण्यात येत आहे.
(फोटो – मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईला जात असलेल्या बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करून पाठींबा



