तपनेश्वर शाळेत निरोप समारंभ; विद्यार्थिनी भावुक शिस्त, संस्कार व आत्मविश्वासाचे धडे ; मच्छिंद्र खैरे

तपनेश्वर शाळेत निरोप समारंभ; विद्यार्थिनी भावुक
शिस्त, संस्कार व आत्मविश्वासाचे धडे ; मच्छिंद्र खैरे
जामखेड प्रतिनिधी : शहरातील तपनेश्वर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात झाला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे,उपाध्यापक प्रताप पवार, उपाध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे म्हणाले, लहान वयात आई-वडील, आजी-आजोबांचे बोट धरून शाळेत येताना घर आणि शाळेच्या वातावरणातील फरक जाणवत होता. सुरुवातीला भीती, संकोच आणि रडूही आले ; मात्र हळूहळू विद्यार्थ्यांनी शाळेला आपलेसे करत शिक्षणाची गोडी लावून घेतली. या शाळेतून केवळ शिक्षणच नव्हे, तर शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वासाचे धडे विद्यार्थ्यांना मिळाले.येथून पुढे ही शाळा आपण भविष्यात जपली पाहिजे,कारण आपण या शाळेच्या वातावरणातून मोठे होतो.भविष्यात शाळेचे कुठलेही नुकसान माजी विद्यार्थी म्हणून आपण करू नये.
शिक्षिका शितल कदम म्हणाल्या, शिस्त, मेहनत आणि चांगल्या सवयी या यशाच्या पायऱ्या आहेत. विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने पुढे जात सतत अभ्यास करत राहावे आणि आपल्या आई-वडील व शाळेचे नाव उज्ज्वल करावे.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी चटई भेट दिली.समारंभाचा शेवट मिठाई वाटप करून करण्यात आला.
*चौकट*
——————————-
*शिक्षकांच्या संस्कारातून विद्यार्थ्यांची जडणघडण*
शालेय जीवनातील आठवणी मनात कायम घर करून राहतात. लहानपणी शाळेत येताना डोळ्यांत अश्रू येतात, आणि शाळा सोडताना देखील तेच अश्रू अनावर होतात. कारण शिक्षणाच्या प्रवासात आई-वडिलांनंतर माया, ममता आणि आदर्श देणारे शिक्षक भेटतात. त्यांच्या शिस्तीचा धाक, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. पुढे हेच विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाने आई-वडील, शाळा आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करतात.



