📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ऊस दरावरून संघर्ष समिती गंगाखेड शुगरवर धडकली

ऊस दरावरून संघर्ष समिती गंगाखेड शुगरवर धडकली
मागण्याच्या मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन
परळी / प्रतिनिधी:-बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यासह सोनपेठ, गंगाखेड परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याऱ्या गंगाखेड येथील जी 7 साखर कारखानाण्याने सुरू असलेल्या गळीत हंगामात पहिली उचल 3 हजार व अंतिम भाव 4 हजार रु देण्यात यावा याकरिता संघर्ष समितीने कारखाना संचालक मंडळांची भेट देत आपले निवेदन दिले. मागण्याबाबत योग्य विचार न झाल्यास दि 15 डिसेंबर पासून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.
वाढती महागाई, खते व निविष्ठा दरवाढ यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने (CACT) १०.२५ उताऱ्यावर २६८०रू. प्रतिटन उत्पादन खर्च जाहीर केला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ऊसदर ४००० रु पेक्षा जास्त मिळायला हवा. रंगराजन समीतीच्या शिफारशीनुसार ऊसा पासून निर्माण होणाऱ्या उप पदार्थाच्या उत्पादनाचा रेव्हेन्यू शेअरींग फार्मूला प्रमाणे त्यात भर पडणे अपेक्षित आहे. सदर बाबी लक्षात घेता ऊसाला किमान प्रति टन ३००० रूपये एक रक्कमी पहिली उचल तर चार हजार रूपये अंतिम दर देण्यात यावा या मागणीला ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दुसऱ्यांदा सोमवार दि 8 रोजी कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले. मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. त्याप्रमाणे आपणही पहिली उचल जाहीर करुन शेतकऱ्यांना आश्वस्त करावे अन्यथा आपल्या कारखाना प्रशासना विरोधात कोयता बंद आंदोलन व दि 15 डिसेंबर रोजी  परळी नाका, गंगारखेड था चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येइल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी संघर्ष समितीचे  कॉ.एड.माधुरी क्षिरसागर कॉ अजय बुरांडे सुनिल पौळ, गोटू जाधव,कॉ.ओंकार पवार, रामेश्वर मोकाशी, सुभाष कदम,कॉ.शिवाजी कदम, श्रीकांत भोसले, गोपीनाथ भोसले, भगवान शिदे, व्यंकटराव भोसले आदींसह संघर्ष समितीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
●●●●●●
■ओंकार केला अंतिम दर जाहीर; संघर्ष समितीला यश
परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार ( वैद्यनाथ) साखर कारखान्याने या वर्षीच्या अंतिम दर जाहीर केला असून पहिली उचल 2950 रु व दिवाळी सणाला 100 रु असा 3050 रु दर देणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर निवेदन करत आपला दर जाहीर केला. संघर्ष समितीच्या आंदोलनाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे.

Back to top button