बीड
परिट धोबी समाजाच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यासाठी नागपूर येथे धरणे आंदोनास सुरुवात-अॅड.सुधीर जाधव

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे समाज बांधवांचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील परिट धोबी समाजाच्या ज्वलंत मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सरकारविरोधात नागपूर येथे अखिल भारतीय परिट धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलनास दि.8 डिसेंबर सोमवार रोजी सुरुवात झाली असून राज्यातील परिट धोबी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लढा यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड.सुधीर जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील परीट धोबी समाज, महाराष्ट्र शासनाकडे ,समाजाच्या मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. परंतू सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने सरकारच्या विरोधात बेमुदत साखळी धरणे प्रदर्शन नागपूर येथे करणार आहेत परीट धोबी समाजाच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
1.महाराष्ट्रातील परीट-धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासंबंधाने धोबी समाज पुनर्विलोकन समिती गठित करून डी एम भांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर ,महाराष्ट्र सरकारने सातत्याने चुकीची शिफारस केंद्राला केली. त्यामुळे परिट समाजाला न्याय मिळाला नाही. करिता योग्य शिफारस करून परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत देण्यात याव्यात.
2.परीट धोबी समाज व तत्सम समाजासाठी अनेक वेळा घोषणा करूनही श्री.संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले नाही, ते तात्काळ स्थापन करून कार्यान्वित करावे व त्याला भरीव निधी देण्यात यावा.
3.महाराष्ट्रातील ओबीसीच्या यादीत अनेक प्रभावी जाती किंबहुना संख्येने मोठ्या जाती असणार्या लोकांना स्वतंत्र सवलत देण्यात आली. त्यामुळे परीट-धोबी समाज व तत्सम 12 बलुतेदार या जाती उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यासाठी बारा बलुतेदार या अल्पसंख्य ओबीसीला विशेष मागासवर्ग म्हणून स्वतंत्र सवलत देण्यात यावी.
4.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारतरत्न म्हणून भारत सरकारने घोषित करावे त्यासाठी महाराष्ट्र सरकारची तात्काळ शिफारस केंद्र शासनाला पाठवण्यात यावी.
5.भारत सरकारने स्थापन केलेल्या सफाई कामगार यादीत भारतातील रजक-धोबी समाज सामील असल्याने महाराष्ट्रातही पारिट-धोबी समाजाला या सफाई कामगार म्हणून स्वतंत्र सहकार्य करण्यात यावे.
6. हैदराबाद गॅझेट चा आधार घेऊन तेलंगणामध्ये परिट-धोबी समाजाला ओबीसी मध्ये विशेष दर्जा देण्यात आला आहे, तो दर्जा महाराष्ट्रातही तात्काळ देण्यात यावा.
या सर्व मागण्या मान्य करून, महाराष्ट्रातील परीट धोबी समाजाला न्याय देण्यात यावा. अन्यथा हा महाराष्ट्रातील परीट धोबी समाज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पासून नागपूर येथे राज्यव्यापी साखळी धरणे प्रदर्शन करणार असल्याचे समाज बांधव तसेच सकल धोबी समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश जगताप बीड जिल्हाध्यक्ष अॅड.सुधीर जाधव, शहराध्यक्ष अंबादास नवले, पप्पू शिंदे, विलास जाधव, जयंत राऊत, अजय जाधव, मनोज वाघमारे, बीड जिल्हा सचिव प्रवीण साळुंके,उपाध्यक्ष जिजा शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळुंके, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष मंगेश घोडके, शहर सचिव अतुल साळुंके, कार्याध्यक्ष संतोष भालेकर, शितल राऊत, अमोल काळे, संदीप जाधव, प्रा. विजय जाधव, मनोज नवले, गणेश धोंगडे, विकी नवले, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश घोडके, गणेश राऊत,मनोज नवले,जगन्नाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.