📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सौ.के.एस.के. (काकू) कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य

सौ.के.एस.के. (काकू) कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्य

स्पर्धेत प्रथम क्रमांक:रिधम डान्स अकॅडमी हैदराबाद तर्फे राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा आयोजन हैदराबाद येथे आयोजन करण्यात आली होती.

या स्पर्धेत सौ.के.एस.के. (काकू) कृषी महाविद्यालय बीड मधील विद्यार्थिनी कु.स्नेहा दुधाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्यांमध्ये भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, ओडिसी, कथकली, मणिपुरी, मोहिनीअट्टम समावेश होता.

आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद (CID) ही पॅरिस, फ्रान्समध्ये मुख्यालय असलेली एक जागतिक संस्था आहे, जी नृत्य क्षेत्राला एकत्र आणते. ही UNESCO च्या संरक्षणाखाली काम करते आणि जगभरातील नृत्याच्या सर्व प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था सदस्य देश, संघटना आणि व्यक्तींना नृत्यासाठी एक मंच आणि युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी सल्लामसलत करण्यासाठी मदत करते. हि संस्था राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा घेते.

स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंखे सर,प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे सर तसेच सर्व सहकारी प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button