📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव संपन्न

तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव संपन्न

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटपाबरोबर वृक्षारोपण उपक्रम

जामखेड : शहरातील तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक १६ जून २०२५ रोजी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व खाऊ देऊन ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे नवागत बालकांच्या पायांना कुंकवात बुडवून कागदावर पायाचे ठसे घेण्यात आले, ज्यामुळे हा क्षण कायमस्वरूपी स्मरणात राहील.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पाठ्यपुस्तक, गणवेश, शूज व सॉक्स यांचेही वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,आम आदमी पार्टीचे नेते संतोष नवलाखा,शिक्षणप्रेमी कुंडल राळेभात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापिका सौ. जया चौभारे, उपाध्यापिका सुजाता राक्षे,उपाध्यापक प्रताप पवार,शुभांगी साळुंके, शितल कदम, निता तांबे, रूपाली कांबळे, संजय आरेकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button