📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राम खाडेंवरील हल्ला गंभीर ; पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा – ना. पंकजाताई मुंडे

राम खाडेंवरील हल्ला गंभीर ; पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा – ना. पंकजाताई मुंडे

बीड।दिनांक २७।:जिल्ह्यातील सामाजिक  कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर असून पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत.

काल रात्री राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, ही बाब अतिशय गंभीर आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. राम खाडे यांना पोलीस सुरक्षा होती ती काढून घेण्यात आली अशी माहिती समजली आहे, ती  का काढून घेण्यात आली ? असा सवाल त्यांनी केला.या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले.
••••

Back to top button