बीड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या, आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला नवीन घर…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून जम्मू-कश्मीरमधील पर्यटकांच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या, आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला नवीन घर…

*युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून कार्यक्रम यशस्वी*..

*शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला.*

२१ एप्रिल २०२६  रोजी
जम्मू-कश्मीरमधील,पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून अद्वितीय शौर्य दाखवत प्राणार्पण करणारे आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी नवीन, सुसज्ज घर बांधून देण्यात आले असून, त्या घराचे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट साहेब, राज्यमंत्री योगेशजी कदम, कॅप्टन अभिजीतजी अडसूळ, युवासेना सचिव विकास गोगावले, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, काश्मीर संभाग शिवसेना अध्यक्ष मोहम्मद शफी मगरे तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामागे युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांचे विशेष प्रयत्न असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला. सामाजिक बांधिलकी जपत एका वीर कुटुंबाला आधार देण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. आदिल हुसैन शाह यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची आठवण ठेवत, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे, या हेतूने उभारण्यात आलेले हे घर केवळ एक निवारा नसून मानवतेचा जिवंत संदेश देणारे प्रतीक ठरत आहे. या घटनेमुळे समाजात सहकार्य, संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना यांचा आदर्श निर्माण झाला असून, गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत आहे.

Back to top button