बीड
राज्यातील महायुतीचे 62% मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले – प्रा. सुशीलाताई मोराळे

बीड प्रतिनिधी:- महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात गेले तीन चार दिवसापासून राडा सुरू आहे. गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड चक्क एकमेकांना मारामारी पर्यंत मजल गेली त्यापूर्वी परब आणि शंभूराज देसाई यांच्यातील हमरी तुमरी जनतेने पाहिली आई बहिणीवर शिव्या ऐकल्या, हा सगळा प्रकार सदनात पहिल्यांदाच दिसला असे मुळीच नाही जे पेरलं तेच उगवणार, विधानसभेत निवडून येण्याचा अलिखित नियम म्हणजे ज्यांच्यावर जास्त गुन्हेगारी खटले आहेत तो तिकिटाला पात्र. खरा अर्बन नक्षलवाद सभागृहात आहे काटेकोर बंदोबस्त असताना बुक्कीवाले सभागृहात जातातच कसे हा प्रश्न आहे. खऱ्या कार्यकर्त्यांना पास बंद मात्र गुंडगिरी प्रवृत्तीच्या दादा लोकांना कोण सभागृहात
पास देतात हे बघायला पाहिजे.
राज्यात महायुतीचे फडणवीस, शिंदे व दादा पवारांचे सरकार आहे या सरकारत 62 टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत असे एका सर्वेक्षणात बाहेर आले आहे 42 मंत्र्याचे मंत्रिमंडळ स्थापन झाले.
मुख्यमंत्री राज्यात स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याची हमी देत आहेत मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात हे वास्तव समोर आले आहे.
उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रकात मंत्र्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे विश्लेषण प्राप्त झाले आहे.
17 मंत्र्यावर म्हणजे 40% मंत्र्यावर खुनाचा प्रयत्न महिलांशी संबंधित फसवणूक खंडणीसारखे गुन्हे आहेत.
भाजपाच्या 20 मंत्र्यांपैकी 16 म्हणजे 80% मंत्र्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यात दहा मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तीन मंत्र्यांवर कुणाचा प्रयत्न करणे अशी नोंद आहे. शिवसेनेच्या 50% मध्ये १२ मंत्र्यांपैकी ६ मंत्र्यांविरोधात गुन्हे नोंद आहेत पैकी तीन जणाविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या 10 मंत्र्यांपैकी चार मंत्र्यांवर गुन्हे दाखल असून चार मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती 447. 09 कोटी असून सर्वात कमी संपत्ती असलेले प्रकाश आबिटकर त्यांची संपत्ती 1.6 कोटी इतकी आहे प्रकाश आबिटकर शेकापाची पार्श्वभूमी असलेले आमदार आहेत त्यांचे वडील शेकापामध्ये होते. राधानगरी हा त्यांचा मतदारसंघ आहे. 42 पैकी 13 मंत्र्यांनी आपले शिक्षण आठवी ते बारावी नमूद केले आहे 25 मंत्र्याचे शिक्षण पदवी आणि पदव्युत्तर पर्यंत झाले आहे चार मंत्री डिप्लोमाधारक आहेत. 29 मंत्री 51 ते 80 वयोगटातील तर 13 मंत्री 50 वर्षाखालील आहेत मंत्रिमंडळात 100% म्हणजे चार महिलांना प्रतिनिधित्व दिले गेले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शासनात चांगला निकाल अपेक्षित करणे अवघडच आहे सभागृहात देवेंद्रजीच्या अब्रुचे पार खोबरे झाले त्यामुळे त्यांनी आपल्या उत्तरात दुःख व्यक्त केले खरं म्हणजे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो या काळाला देवेंद्रजींना रोखावेच लागेल. हे सर्वेक्षण मंत्र्याचे आमदाराचे यापेक्षा वाईट हाल आहेत एकूणच बघितले तर सरकारच गुन्हेगारांना अभय देत आहे.