बीड
आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट अनेक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट
अनेक प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी
बीड दि.२१ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाशी निगडित असलेल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२१) रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन लवकरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली.
बीड जिल्ह्यातील महसूलात वाढ करणे, सुशिक्षित तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच महसूल विभागाचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेंतर्गत बीड मतदारसंघातील वाडी-वस्त्यांच्या रस्त्यांना रस्त्यासाठी भरीव तरतूद करावी, या आणि अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर ही बैठक झाली. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता दर्शवून लवकरच प्रलंबित मार्गी लागणार असल्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे.



