सहयोग बँकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी- सहयोग बॅंक येथे दर महिन्याप्रमाणे मासिक बैठक पार पडली. यावेळी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बैठकीदरम्यान उपस्थित सर्व महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच दर महिन्याप्रमाणे स्वयंसेविकांची बैठकही घेण्यात आली. मागील महिन्यात शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पात्र स्वयंसेविकांना उपहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेच्या कार्याबाबत तसेच कलेक्शन कसे वाढवावे याबाबत स्वयंसेविकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सहयोग बँकेचे सदस्य तसेच पतंजली लोकजागर परिवार यांच्या वतीने संपूर्ण सहयोग बॅंक समुहाचे आभार व्यक्त करण्यात आले. बँकेचा हा प्रेमळ व कार्यतत्पर समुह पुढील काळातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करीत राहो, अशी भावना व्यक्त करण्यात आली.



