📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सनराईज इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सनराईज इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*_

जामखेड प्रतिनिधी – शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे सनराईज इंग्लिश स्कूल पाडळी येथील विद्यार्थ्यांनी सनराईज् इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल बिभीषण भोरे,अमर भैसडे, सानिया सय्यद, भाऊसाहेब भोईटे,अंजली कात्रजकर, प्रियंका भैसडे,,अर्चना मोहळकर,कांचन पवार, दीपक दहीकर आदी शिक्षकांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक प्रा.तेजस (दादा) भोरे यांच्या हस्ते सरस्वती पुजन करण्यात आले व त्यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले की जीवनाच्या प्रत्येक वळणावर संस्काराची,ज्ञानाची,मार्गदर्शनाची शिदोरी देणारे आई – वडील, शिक्षक हेच गुरु असतात,ज्ञान देण्याचे महत्त्वाचे कार्य गुरु करत आपण कितीही मोठे झालो तरी गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, संस्थेच्या सचिव तथा साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.अस्मिता जोगदंड/भोरे मॅडम, यांनी सर्व , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना_ _गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button