📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर;नगरसेवक संजय काशिदांची स्वच्छता मोहीम हाती

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर;नगरसेवक संजय काशिदांची स्वच्छता मोहीम हाती

लक्ष्मी चौकातील नाली समस्या अखेर निकाली

जामखेड प्रतिनिधी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आणि नालेसफाईच्या कामांना गती देत लक्ष्मी चौकातील तुंबलेल्या नालीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

नगरसेवक तथा भाजपा शहर मंडल तालुका अध्यक्ष संजय (काका) काशिद यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जामखेड नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नवीन जामखेड नगर परिषद लगत (लक्ष्मी चौक) येथे मागील काही दिवसांपासून नालीचे पाणी तुंबून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाला या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीच्या आजारांची भीतीही निर्माण झाली होती.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी ही समस्या नगरसेवक संजय (काका) काशिद यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ लक्ष्मी चौक परिसराची पाहणी केली. यावेळी भाजपा शहर मंडल उपाध्यक्ष अर्जुन म्हेत्रे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी नाली तुंबण्यामागील कारणांची माहिती घेत संबंधित नगर परिषद कर्मचाऱ्यांना तातडीने सफाई व दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर नगर परिषद यंत्रणेच्या माध्यमातून नालीतील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवून दुर्गंधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी गटारे आणि नाल्यांची वेळेत स्वच्छता होणे आवश्यक असल्याचेही यावेळी संजय (काका) काशिद यांनी सांगितले.

चौकट
——————–
पावसाळ्यात साथीचे आजार फैलावण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय पथके सतर्क व सज्ज ठेवावीत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही.

-वैशाली अर्जुन म्हेत्रे (सभापती – स्वच्छता आरोग्य, समिती, जामखेड नगर परिषद)

Back to top button