बीड

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीकडून ; आमदार सुनील कर्जतकर यांचा सन्मान

दि.पिपल्स एज्युकेशन सोसायटीकडून ; आमदार सुनील कर्जतकर यांचा सन्मान

जामखेड प्रतिनिधी: तालुक्यातील नान्नज येथील भूमिपुत्र तथा आमदार सुनील कर्जतकर यांची महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालय येथे संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कर्जतकर यांचा फेटा बांधून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सचिव अरुण चिंतामणी, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, संचालक शिवाजी कासार, दत्तात्रय वडे, दिपक होशिंग आदींसह माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे,माजी प्राचार्य श्रीकांत होशिंग,प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य प्रा. युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, जेष्ठ लिपिक रामचंद्र होशिंग,प्रा.विश्वनाथ आघाव,प्रा.विनोद धुमाळ, उमाकांत कुलकर्णी तसेच उद्योगपती विजय कोठारी, सुभाष भंडारी,नगरसेवक प्रा. विकी घायतडक, प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर आदी मान्यवर तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button