बीड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 गेवराईचे मंथन परीक्षेत दणदणीत यश

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 गेवराईचे मंथन परीक्षेत दणदणीत यश
तालुक्यातुन शुभ्रा अतकरे पहिली, सोनवणे ज्ञानेश्वरी दुसरी, अमृता आतकरे दुसरी, ज्ञानेश्वरी कवडे चौथी, श्रीकांत आतकरे चौथा तर पुनम उदावंत सातवी
गेवराई (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर – 1, गेवराई या शाळेचे मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये दणदणीत यश मिळवले असून सोनवणे ज्ञानेश्वरी, श्रीकांत आतकरे शुभ्र आतकरे, ज्ञानेश्वरी कवडे, पुनम उदावंत व अमृता आतकरे यांनी चमकदार कामगिरी करत तालुक्यात शाळेची मान उंचावली आहे.
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होताना दिसून येत आहे तर, दुसरीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक गेवराई येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. यावर्षी झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा (मंथन परीक्षा) ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात घेतली जाणारी अतिशय दर्जेदार अशी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये गेवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक चे विद्यार्थी सोनवणे ज्ञानेश्वरी बळीराम वर्ग पहिला तालुक्यात दुसरा क्रमांक, श्रीकांत अमोल आतकरे वर्ग दुसरा तालुक्यात चौथा क्रमांक, शुभ्रा अंकुश आतकरे वर्ग तिसरा तालुक्यात प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वरी सचिन कवडे वर्ग तिसरा तालुक्यात चौथा क्रमांक पुनम विलास उदावंत वर्ग तिसरा तालुक्यात सातवा क्रमांक व अमृता अमोल आतकरे वर्ग चौथा तालुक्यात दुसरा क्रमांक मिळविला असुन या विद्यार्थ्यानी शाळेची मान उंचावली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



