बीड

मादळमोही अर्बन बँकेच्या चेअरमनपदी संदिप आंधळे तर व्हाईस चेअरमन म्हणून कैलास भुजबळ यांची निवड….

मादळमोही अर्बन बँकेच्या चेअरमनपदी संदिप आंधळे तर व्हाईस चेअरमन म्हणून कैलास भुजबळ यांची निवड….
कोळगाव, बाळासाहेब घाडगे – गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मादळमोही अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीची निवडणूक दि.०९ एप्रिल रोजी पार पडली. यात संस्थेच्या चेअरमनपदी श्री संदिप भैय्या आंधळे तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री कैलास नाना भुजबळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मादळमोही अर्बन बँकेनी व्यवसाय शेती माध्यमातून परिसरातील व्यावसायिक शेतकरी खातेदारांना बँकिंग सेवा देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज ही संस्था मागील चार वर्षांपासून सेवा देणारी म्हणून ओळखली जात असून पाच हजारांहून अधिक खातेदारांना सेवा देते. दरम्यान या पतसंस्थेची निवडणूक दि.०९ एप्रिल २०२५ रोजी पार पडली. यामध्ये चेअरमनपदी श्री संदिप भैय्या आंधळे तर व्हाईस चेअरमन म्हणून श्री कैलास नाना भुजबळ यांची सर्वानुमते निवड झाली. तर संस्थेचे संचालक निलेश भोपळे, पवन गावडे, सचिन तळेकर, अशोक पायघडे, सूरज चाळक, देवेंद्र तळेकर, आकाश घोडके करण्यात आली आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी म्हणून श्री.एस एम बारगजे सर यांनी काम पाहिले तर सहकार अधिकारी देशपांडे सर व संस्थेचे व्यवस्थापक श्री फुलझळके सर यांनी सहकार्य केले. या निवडीबद्दल पतसंस्थेचे, खातेदार ठेवीदार, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नागरिक यांनी आनंद व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button