बीड

फक्त पोलीस बनून थांबू नको पुढील परीक्षा देऊन परिवाराचे नाव आणि समाजाचे नाव मोठे कर

फक्त पोलीस बनून थांबू नको पुढील परीक्षा देऊन परिवाराचे नाव आणि समाजाचे नाव मोठे कर
-आम्रपाली साबळे (अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार निर्मूलन समिती मराठवाडा उपाध्यक्ष )

 पुणे पोलीस भरती मध्ये बीडच्या शेख रुक्सार या युवतीने पहिल्याच प्रयत्नामध्ये यश संपादन केले. बीडचे सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस यांची ती कन्या आहे. घरामध्ये नेहमीच चळवळीचे आणि आंदोलनाचे वातावरण त्यामुळे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये फार वेगळे वातावरण आपणास पहावयास  मिळते. परंतु जिद्दीवर आणि शिक्षणावर वचक मिळवून या युवतीने पोलीस भरतीमध्ये अगदी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आणि घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसतानाही पहिली सरकारी नोकरी मिळवली. सामाजिक कार्यकर्त्या तथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या मराठवाडा उपाध्यक्ष आम्रपाली साबळे आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मोनिका बेद्रे यांनी तिचे हिंदू कोड बिल 1950 हे पुस्तक देऊन कौतुक करून आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी भाषणामध्ये बोलताना त्यांनी तिला प्रेरणा देत म्हटले की तू मुलगी आहेस या बंधनात न थांबता पुढे प्रशासनातील आणखीन मोठ्या पदव्या मिळून अजून याच्याही पेक्षा मोठे यश संपादन कर आणि भारताची सेवा कर व बीडचे नाव लौकिक कर आणि परिवाराचे नाव लौकिक कर. कार्यक्रम लिंबागणेश चे सामाजिक कार्यकर्ते चळवळीमध्ये नेहमी सक्रिय असणारे डॉक्टर गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी अनेक विविध संघटनाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button