संपादकीय

संजय राऊतांचे नेते बदलले, फडणवीसांनी घेतली तीन नेत्यांची नावे

 

शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसची भलामण करण्यात आली होती. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राऊत यांचे तीन नेते कोण यांची नावंही फडणवीसांनी सांगितली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला आहे. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

फडणवीसांनी यावेळी एसटीच्या संपावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एसटीचा संप मिटावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहाकार्य केलं. आता सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं. पण सरकार कामगारांसाठी दोन पावलं पुढं यायला तयार नाही. काल उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळलं. मला वाटतं सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. अजूनही वेळ गेली नाही. मेस्मा लागण्याआधी चर्चेतून मार्ग काढा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

Back to top button