संपादकीय

राष्ट्र्वादीने काँग्रेसचा सदस्य फोडला, आता पुन्हा आघाडी होणार बिघाडी

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात महाविकास आघाडीत खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत असताना दुसरीकडे स्थानिक राजकारणात सुद्धा या तिन्ही पक्षात खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता बीडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्र्वादीने काँग्रेसला खिंडार पाडले असून थेट काँग्रेसचा सदस्य राष्ट्र्वादीत घेतलेला आहे.

काँग्रेसचे माजी बीड जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कर्यलायात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात १७ शाखा आहेत. अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते काँग्रेसचं काम करत होते. १४ वर्षे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. तसेत २०१३ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. २००९ ते २०१८ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ नागपूरचे उपाध्यक्ष होते.

Back to top button