बीड

श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ वे वर्ष… . श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ला झिरो नेट एन.पी.ए सह १४ कोटी नफा…

श्री मंगलनाथ संस्थेचे यशस्वी २५ वे वर्ष… .
श्री मंगलनाथ मल्टीस्टेट ला झिरो नेट एन.पी.ए सह १४ कोटी नफा…

बीड प्रतिनिधी :-श्री मंगलनाथ मल्टिस्टेट ला मार्च २०२५ अखेर १४ कोटी नफा प्राप्त झाला असून नेट एन.पी.ए झिरो करण्यात यश प्राप्त झाले आहे संस्थेला २५ वर्षे सभासदांच्या सेवेत पूर्ण झाली आहेत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासद,हितचिंतक,नागरिक यांच्या विश्वासास सदैव पात्र राहुन घवघवीत यश संपादन करत १४ शाखांच्या माध्यमातून 502 कोटी व्यवसाय यशस्वी पूर्ण केला आहे. संस्थेने गेली २५ वर्षात सभासदांच्या अपेक्षा जाणून कार्य केले आहे त्यामुळे सभासदांचा बहुमूल्य प्रतिसाद प्राप्त करून गेली २५ वर्ष संस्था अविरत अखंड कार्य करत आहे. संस्थेने ग्रामीण भागापासून ते शहरी भागात शाखांचा विस्तार केलेला असून सर्व शाखा या नफ्यात आहेत. मराठवाड्यातील सर्वात जास्त सोने तारण कर्ज वाटप करणारी एकमेव संस्था म्हणून संस्थेचे नाव लौकिक आहे संस्थेची प्रतिमा कायम ठेवून संस्थेने आखलेल्या १००० कोटी व्यवसाय पूर्ततेच्या अनुषंगाने काम करत येणाऱ्या काळात अल्प व्याजदरात जास्तीजास्त सोनेतारण कर्ज वाटप करून सभासदांच्या ठेवीना अधिकाधिक सुरक्षा देण्याचा मूळ उद्दिष्ट संस्थेचा आहे.

संस्थेचे अध्यक्ष मा.आर.जी.कानडे यांनी या यशाबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले कि, संस्थेने केवळ व्यवसाय वाढीस व नफा वाढीस प्राधान्य न देता विश्वासाहर्ते बरोबर पारदर्शक व्यवहारास प्राधान्य देऊन संस्थेच्या सभासदांच्या ठेवीना सुरक्षा निर्मितीकरीता अल्प व्याजदरात सुरक्षित कर्ज वाटपास नेहमीच प्राधान्य दिले आहे. संस्थेचे मार्च २०२५ अखेर संस्थेच्या 300 कोटी ठेवी व एकूण २०२ कोटी कर्ज वाटप आहे त्यामध्ये सुरक्षित सोनेतारण कर्ज ,वेअरहाऊस कर्ज ,मुदत ठेव कर्ज अधिकाधिक वाटप असून एकूण कर्जवाटपाच्या ९९.२४ टक्के कर्ज हे सुरक्षित आहे त्यामुळे निश्चितच सुरक्षित कर्ज वाटपाच्या माध्यमातून सभासदांच्या ठेवीना सुरक्षा कवच निर्माण केले आहे. तसेच संस्थेने कर्ज वसुलीत देखील यश संपादन करून नेट एन.पी.ए ० झिरो केला आहे संस्थेची एकूण गुंतवणूक १०२ कोटी आहे. तर संस्थेचा स्वनिधी ४० कोटी तर खेळते भांडवल 330 कोटी आहे. या आर्थिक वर्षात संस्थेद्वारे 6993 कोटीपेक्षा अधिक उलाढाल करून ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देण्याचे काम संस्थेने केले आहे. सर्व तरतुदी व खर्च वजा जात निव्वळ नफा ५.२८ कोटी झालेला असून सदरील नफ्यातून सभासदांच्या हिताच्या दृष्टीने विविध योजनां राबवण्याचा मानस संस्थेने आखलेला आहे तसेच संस्था स्थापनेपासून १२% लाभांश सभासदांना देते या पुढे देखील सभासदांना १२% प्रमाणेच लाभांश देण्याचा दृढ निश्चय संस्थेने केला आहे. संस्थेने सभासदांच्या हित जोपासून ठेवीच्या सुरक्षितततेला प्राधान्य देत कार्य केले म्हणून सभासदांचा संस्थेवरील सदैव असणाऱ्या विश्वासास पात्र राहत संस्था अखंडित गेली २५ वर्षांपासून सातत्याने सभासदांना आधुनिक तंत्र ज्ञानाचा अवलंब करून जलद गतीने सेवा देत आहे. आणि निश्चितच पुढील काळात देखील संस्था सभासदांच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करण्यास कटिबद्ध असून सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कार्य करेल संस्थेच्या या घवघवित यशाबद्दल संस्थेचे सर्व सभासद,हितचिंतक,मित्र परिवार यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले…

Back to top button