📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

संत भगवान बाबा प्रतिष्ठानचा सप्ताह म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी परंपरा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

संत भगवान बाबा प्रतिष्ठानचा सप्ताह म्हणजे राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी परंपरा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड दि.27 (प्रतिनिधी) – गेल्या 29 वर्षांपूर्वी सुरू केलेला भगवान बाबा प्रतिष्ठान येथील अखंड हरिनाम सप्ताह आज राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा जपत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान येथे 29 वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी महंत त्रिविक्रमानंद महाराज यांच्या कीर्तन प्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उपस्थित होती. समितीच्या वतीने प्रारंभी स्वागत करण्यात आले तसेच प्रतिष्ठानच्या विकासासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाल्याबद्दल संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्व.डॉ.श्रीहरी लहाने यांनी या प्रतिष्ठानसाठी मोठे योगदान दिले आहे. या प्रतिष्ठानच्या विकासासाठी सातत्याने संपर्कात होते सत्ता असो अथवा नसो सेवाभाव ठेवून आपण काम करतो त्यामुळे प्रतिष्ठान साठी मला हातभार लावता आला याची समाधान वाटते श्रद्धेची सुमने वाहण्याची संधी मिळते या ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जातात वै. बंकट स्वामी महाराजांनी सुरू केलेली किर्तन परंपरा आज ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. माणुसकीची शिकवण या माध्यमातून दिली जाते. संत कुठल्या जातीत जन्मले आणि कोणत्या समाजासाठी काम केले यापेक्षा त्यांनी समाजासाठी योगदान दिले हेच महत्त्वाचे असते माणूस कुठल्या जातीत जन्माला यावा हे विधात्याच्या हाती असते, माणसाचा जन्म समाजासाठी कारणी लागतो हेच यातून बोध घेण्यासारखे आहे. मलाही धार्मिक स्थळाच्या विकासासाठी सेवा करण्याची संधी मिळाली आहे. धार्मिक स्थळांचा विकास होणे गरजेचे आहे कारण याठिकाणी हजारो भाविकांची उपस्थिती असते त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, ह.भ.प. हरिदास जोगदंड, सखाराम मस्के, नवनाथ कुलकर्णी, ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे, स्वामी शिवरुद्रनंद महाराज, ह.भ.प.बाबुराव मुंडे, रामनाथ खेडकर, अनिरुद्ध सानप, अ‍ॅड.जयंत राख, नाना सानप, नारायण मुंडे, बाजीराव खेडकर, डॉ.सुधाकर आंधळे, गरकळ बाबा, डॉ.माधव सानप, गणेश खाडे, उमेश फड, महादेव घोळवे, प्राचार्य वसंतराव सानप, प्रा.गर्जे,पत्रकार नारायण नागरे, आनंद घुगे, ज्ञानोबा वायबसे यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button