बीड

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे  यांच्या बीड शहरातील कचरा डेपोतील प्लास्टिकमुळे गायींचा जीव धोक्यात!

पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे  यांच्या बीड शहरातील कचरा डेपोतील प्लास्टिकमुळे गायींचा जीव धोक्यात!
राज्य सरकारने दिलेला ‘राजमाता’ सन्मान फक्त घोषणापुरताच का? :– डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर**
बीड : (दि. २७) राज्यात गायीला “राजमातेचा” दर्जा देण्याचा निर्णय नुकताच जाहीर झाला आणि या निर्णयाचे जनतेत स्वागतही झाले. मात्र पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या गृह जिल्ह्यातच गायींचे प्राण धोक्यात आले असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
शहरालगतच्या खंडेश्वरी – श्री खंडोबा मंदिर रस्त्यालगत नगरपालिकेने सुरू केलेल्या कचरा डेपोमुळे येथे भटकणाऱ्या गायी प्लास्टिक, काच, लोखंडासारखा जीवघेणा कचरा खात आहेत. त्यामुळे गायींच्या आरोग्यावर थेट जीवघेणा परिणाम होतो असून, हा डंपिंग ग्राउंड अधिकृत आहे की अनधिकृत याविषयीही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात गायरान जमिनीचा बेकायदेशीर वापर केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, हे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे खुले उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांना तक्रार – सखोल चौकशीची मागणी
सदर प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते व मुख्य प्रचारप्रसार प्रमुख (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य)
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी खालील मंत्र्यांना लेखी तक्रार केली आहे —
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री — पंकजा मुंडे
मुख्यमंत्री — देवेंद्र फडणवीस
पालकमंत्री — अजितदादा पवार
महसूल मंत्री — चंद्रशेखर बावनकुळे
डॉ. ढवळे यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गायरान जमीन कायदेशीर हक्काची — पण बीडमध्येच तिचा डंपिंग ग्राउंडसाठी वापर?
गायरान जमीन ही कायद्यानुसार सरसकट जनावरांच्या चरण्यासाठी राखून ठेवलेली सार्वजनिक संपत्ती आहे.
या जमिनीचा वापर —
कचरा डेपो
अवैध बांधकाम
राजकीय/व्यावसायिक वापर
… करण्यास स्पष्ट कायदेशीर बंदी आहे.
मात्र बीड शहरातच गायरान जमीन डंपिंग ग्राउंडसाठी वापरली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून नगरपालिकेने यात आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी झाली आहे.
कचरा खाताना गायींच्या आरोग्याचा जीवघेणा प्रश्न
शहरालगतच्या कचरा डेपोजवळ गायी चरत चरत कचऱ्यातील प्लास्टिक व हानिकारक वस्तू खातात.
यामुळे—
पोटात प्लास्टिक, काचा, लोखंड जमा होते
आंत्रविकार, पचनसंस्थेचे गंभीर आजार
प्राणघातक परिस्थिती
मृत्यूचे प्रमाण वाढते
“याकडे यंत्रणांनी गंभीरतेने कधी पाहणार?”
असा थेट सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे.
‘राजमाता’चा सन्मान फक्त कागदावर? — डॉ. ढवळे
“गायीला राजमातेचा सन्मान देतो म्हणणारे सरकार तिच्या चराईच्या हक्कावर होणारे आक्रमण थांबवणार कधी?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
गायरान जमीन कमी केल्यानेच जनावरं शहरात भटकतात, कचरा खातात आणि मृत्यूला सामोरी जातात.
ही व्यवस्थात्मक चूक असून जनावरांना दोष देणे म्हणजे अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. ढवळे व पर्यावरणप्रेमींच्या ठोस मागण्या
१) कचरा डेपो तातडीने सुरक्षित स्थळी हलवावा किंवा बंदिस्त करावा.
२) गायराण जमिनीवरील अतिक्रमणांची तपासणी व उठावणी.
३) जनावरांसाठी मुक्तपणे फिरण्याची व चरण्याची जागा पूर्ववत करावी.
४) राज्यस्तरीय गायराण संरक्षणासाठी स्वतंत्र निरीक्षण प्राधिकरण स्थापन करावे.
५) गायराण वापरबदल करताना ग्रामसभेची संमती बंधनकारक करावी.
६) पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री यांनी चौकशी करून कारवाई करावी.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.८१८०९२७५७२
Back to top button