बीड

अनिलदादांनी पालकत्व स्विकारून बीडमध्ये युवासेना मजबूत करावी- निलेश शिंदे

अनिलदादांनी पालकत्व स्विकारून बीडमध्ये युवासेना मजबूत करावी- निलेश शिंदे

युवा विजय मराठवाडा दौऱ्यात बीडमध्ये पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न!
बीड, प्रतिनिधी-   हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख पुर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली युवासेना आयोजित युवाविजय मराठवाडा दौरा पार पडतो आहे. या दौऱ्यात ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका देखील घेण्यात येत आहे. अगदी याप्रमाणेच बीडमध्ये देखील आज युवाविजय दौऱ्यातील आढावा बैठका संपन्न होत आहेत. शिवसेना पक्षाला ताकद देण्यासाठी, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही सर्व युवांनी वज्रमुठ आवळली असून आता चाळीस वर्ष राजकारणात राहून शिवसेना पक्ष बांधणीसाठी सर्वोपरी योगदान देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी एक मोठा भाऊ या नात्याने बीड जिल्हा युवासेनेचे पालकत्व स्वीकारून युवासेना मजबूत करावी असे अहवान युवसेना मराठवाडा सचिव निलेश भाऊ शिंदे यांनी युवाविजय मराठवाडा दौऱ्याच्या पदाधिकारी आढावा बैठकीत केले. काल दि. 25 फेब्रुवारी रोजी बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे युवाविजय मराठवाडा दौऱ्यातील पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीसाठी युवासेना मराठवाडा सचिव निलेश भाऊ शिंदे, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, युवासेना मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षाताई चौगुले, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव,
युवासेना जिल्हाप्रमुख रविराज बडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुजित शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख स्वप्नील भैय्या गलधर उपस्थित होते. जिल्हाप्रमुख रविराज बडे, युवासेना जिल्हाप्रमुख सुजित शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकता शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत युवासेनेच्या कार्याचा आढावा मांडला व पुढील वाटचालीसाठी आम्हाला सहकार्य मार्गदर्शनाची आवश्यकता असून आम्ही पूर्ण ताकदीने बीड जिल्ह्यात युवासेनेची ताकद वाढवू असा शब्द दिला. युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी आपल्या भाषणामध्ये अनिल दादा हे मला गुरुस्थानी असल्याचे नमूद केले तर विनाकारण आमच्या दोघांमध्ये कुठलेही वैर नसताना पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झालेले असल्याचे मत बाजीराव चव्हाण यांनी मांडले. युवासेना मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा ताई चौगुले यांनी युवा हा राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा मजबूत पाया असल्याने युवसैनिकांनी मोठ्या ताकदीने युवासेनेची ताकद वाढवण्या बाबत मार्गदर्शन केले. यानंतर युवासेना आयोजित युवा विजय मराठावाडा दौऱ्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली व याबरोबरच बीडमध्ये युवा विजय मराठावाडा दौऱ्याची सांगता देखील झाली. दरम्यान आढावा बैठकीसाठी जिल्हाभरातून शिवसेना, युवसेना, शेतकरीसेना महिला आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—–
चौकट
युवासेनेच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर- अनिलदादा जगताप
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा यांनी आपल्या भाषणात युवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, आपण महाराष्ट्रवासियांना आदर्शवत असणाऱ्या एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्त्यांना वेळ देणे, त्यांना जपने हा शिंदे साहेबांचा स्वभाव आहे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना अडीज वर्षात अठरा अठरा तास सर्व सामन्यांसाठी केलेल्या कार्यामुळे आपल्याला गावख्येड्यात ओळख मिळाली आहे. शिंदे साहेबांमुळेच समाजात आपला आदर सन्मान वाढला आहे. हे युवसैनिकांनी लक्षात घेऊन युवासेनेची वाटचाल सुरु ठेवावी. याबरोबरच संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे आणि युवासेनेचे सर्व कामकाज पाहताना शिवसैनिकांना आणि युवासैनिकांना मोठा आधार देण्याचा सर्वोपरी प्रयत्न करतात. एवढेच नाही तर त्यांचं सातत्याने म्हणणं असतं की, जो काम करेगा वो आगे आयेगा, अगदी याच प्रमाणे युवा सैनिकांनी आपल्या कामातून मोठं व्हावं आणि आपले नेते एकनाथजी शिंदे साहेब, डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना ताकद द्यावी. युवासेना प्रमुख पूर्वेशजी सरनाईक साहेब हे देखील युवासेनेला भरभक्कम साथ देण्यासाठी सदैव पुढाकार घेऊन काम करतात, युवासैनिकांना पुढे आणण्यासाठी नियमित धडपड करतात यामुळे युवासैनिकांनी कुठलाही किंतु परंतु न ठेवता पूर्ण ताकदीने पक्ष बांधणीच काम करावं. मी 2006 पासून शिवसेनेचे इमानदारीने काम केले असून इथून पुढे जिथे जिथे युवासेनेला माझी गरज भासेल तिथे तिथे मी युवासेनेला सहकार्य करण्यासाठी उपस्थित राहिल. असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या भाषणात युवासेनेला सांगितले.
°°°°°
Back to top button