बीड

बीडच्या संस्थान कोरडे गणपती मंदिरात  सामुदायिक महागणेशयागाचे आयोजन 

बीडच्या संस्थान कोरडे गणपती मंदिरात
सामुदायिक महागणेशयागाचे आयोजन
प्रतिनिधी । बीड
बीड शहरातील काळेगल्ली येथील श्री संस्थान कोरडे गणपती मंदिरात बुधवार २१ जानेवारी २०२६ रोजी गणेशव्दार पुजन निमित्त सामुदायीक महागणेशयाग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ते ५ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड शहरातील  कोरडे गणपती हे  प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर  काळे गल्ली परिसरात असुन  भाविकांमध्ये खूप श्रद्धेचे स्थान आहे, विशेषतः गुढीपाडवा आणि गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये येथे मोठी गर्दी असते. प्रत्येक महिन्यातील  संकट चतुर्थीस रात्री चंद्रोदयाच्या वेळी मंदिरात ५१ दिवे प्रज्वलित केले जातात. रात्री दिव्यातून गणेशाचे दर्शन घडते. मुंबई, पुणे, आळंदी, नगर ,छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथील भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात.  येत्या गुरूवार २२ जानेवारी २०२६ रोजी गणेश जयंती निमित्त कोरडे गणपतीचा पारंपारीक पालखी सोहळा होणार आहे.सायंकाळी ५ वाजता मिरवणूकीस सुरूवात होणार आहे. कार्यक्रमास गणेशभक्तांनी उपस्थीत रहावे असे आवाहन गणेश मित्र मंडळ व सिध्दीविनायक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button