बीड

लोकविकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, गटनेता आणि नगरसेवकांचा सत्कार

लोकविकास महाआघाडीच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, गटनेता आणि नगरसेवकांचा सत्कार
*हाजी मेहमूद दादामियाॅं आणि हाजीलाला परिवाराकडून स्वागत समारंभ*
=======================
 *अंबाजोगाई (प्रतिनिधी)बालाजी देशमुख*
अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकविकास महाआघाडीचे सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. तसेच २ स्विकृत नगरसेवक यांची बिनविरोध निवड झाली. सध्या महाआघाडीचे उपनगराध्यक्ष, गटनेता व एकूण २२ नगरसेवक यांच्या छोटेखानी कौटुंबिक सत्कार समारंभाचे आयोजन हाजी मेहमूद दादामियाॅं आणि हाजीलाला परिवाराकडून रविवारी करण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत लोकविकास महाआघाडीचे सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. तसेच स्विकृत नगरसेवक म्हणून राजकिशोर मोदी व बबनराव लोमटे यांची बिनविरोध निवड झाली. सध्या महाआघाडीचे उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, गटनेता सय्यद ताहेरभाई व एकूण २२ नगरसेवक यांच्या छोटेखानी कौटुंबिक सत्कार समारंभाचे आयोजन हाजी मेहमूद दादामियाॅं आणि हाजीलाला परिवाराकडून रविवारी करण्यात आले होते. यावेळी लोकविकास महाआघाडीचे प्रमुख नगरसेवक राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.विष्णुपंत सोळंके, उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक बबनराव लोमटे, विशाल जाजू, दाजीसाहेब लोमटे, भिमशक्तीचे भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, स्टार प्रचारक डॉ.राजेश इंगोले, ज्येष्ठ नगरसेवक हाजी इस्माईल हिरू गवळी, महेश बाळासाहेब कदम, महेश बालासाहेब लोमटे, ऍड.विकास रामकृष्ण काकडे, आकाश जिवनराव कराड, राजपाल संभाजी जावळे, नजीर उमरदराजखान पठाण, अमोलराव लोमटे, शेख मोईनभाई, अकबरखाँ पठाण,‌ सचिन जाधव, दत्तात्रय सरवदे यांच्यासह अशोक मोदी, रमण सोनवळकर, अंकुश हेडे, शहेबाज मणियार तसेच माजी पाणीपुरवठा सभापती अनिसभाई मोमीन, कार्यकर्ते अश्विन सावंत यासह उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक खालेदभाई चाऊस, माजी नगरसेवक गणेश मसने, जावेद गवळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकविकास महाआघाडीचे स्टार प्रचारक शहेबाज मणियार यांनी केले. यावेळी स्टार प्रचारक तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी उपस्थित सर्व सत्कारमूर्तींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. तर उपस्थितांचे आभार नगरसेवक अकबरखाँ पठाण यांनी मानले. हाजी मेहमूद दादामियाॅं आणि हाजीलाला परिवाराकडून फटाके फोडून व स्नेह भोजन आयोजन, मिठाई वाटप करून स्वागत समारंभाच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आला. याप्रसंगी लोकविकास महाआघाडीचे नेते व अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
*आमचे प्राधान्य अंबाजोगाईकरांच्या सेवेला :*
लोक विकास महाआघाडीचे उपनगराध्यक्ष, गटनेता व सर्व २२ नगरसेवक आणि पराभूत सहकारी उमेदवार यांच्या एकत्रित स्नेह भोजन व सत्काराचे आयोजन आमचे ज्येष्ठ सहकारी हाजी महेमूद दादामियाॅं व त्यांचे बंधू उमेदवार हाजी लाला यांनी रविवारी केले होते. विजेत्यांचे अभिनंदन व जे अत्यल्प मतांनी पराभूत झाले त्यांना प्रोत्साहन व नवी उमेद देणारा हा सत्कार समारंभ कौटुंबिक होता. यावेळी आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आपुलकीने स्वागत केले. त्याबद्दल लोकविकास महाआघाडीच्या वतीने शेख कुटुंबिय यांचे मी आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. जनतेच्या आशिर्वादरूपी पाठिंब्यामुळे आम्हाला जनसेवेसाठी नवे बळ मिळते. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे. यापुढील काळात ही अंबाजोगाईकरांच्या सेवेला आमचे प्रथम प्राधान्य असणार आहे.
*~ राजकिशोर मोदी*
(नगरसेवक तथा प्रमुख, लोकविकास महाआघाडी, अंबाजोगाई.)
Back to top button