बीड

कंपनी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा ; अजून किती बळी जाणार? – पै.काकासाहेब गर्जे

कंपनी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा ; अजून किती बळी जाणार? – पै.काकासाहेब गर्जे

जामखेड तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन

जामखेड प्रतिनिधी;-राष्ट्रीय महामार्गाचे झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य आहे. सदर कंपनी व ठेकेदार नागरिकांच्या जिवाशी ही खेळत आहेत .कामांमधे सातत्य नाही,त्यामुळे अनेक नागरिकांचे अपघाती मुत्यू झाले आहेत तसेच अनेकांना अपंगत्व आले आहे.
अजून किती बळी जाणार ? आशा ठेकेदारावर प्रशासनाने मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी बाजार समितीचे माजी संचालक पै.काकासाहेब गर्जे यांनी केली आहे.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जामखेड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार पाडळे व पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक गणेश आजबे, नगरसेवक ऋषिकेश बांबरसे आदी उपस्थित होते.

जामखेड – सौताडा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या ठिकाणी कोठेही दिशादर्शक फलक नाहीत.अपघात होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नाही तसेच रस्ता दुभाजक टाकले आहेत अशा ठिकाणी रिप्लेक्टर बसवले नाहीत त्यामुळे या अर्धवट रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडल्या असुन अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत.तसेच शहरात महामार्गाचे काम रखडल्याने नागरिक, व्यावसायिक हैराण झाले आहेत. विशेषतः बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट स्थितीत असल्याने उडणारी धूळ त्रासाचे कारण ठरत आहे. रस्त्यावर खाचखळगे, फुफाटा आहे. यामुळे वाहनधारक, दुतर्फा राहणे नागरिक यांना सततच्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील व्यापारी स्व.महादेव काळे व जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी धनंजय गुडवाल यांचे अपघाती निधन झाले आणि या अपघाताला सदर रस्त्याचे काम करणारी कंपनी व ठेकेदार कारणीभूत असुन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा प्रशासनाने दाखला करावा अन्यथा दि. ३/३/२०२५ रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन काकासाहेब गर्जे यांनी प्रशासनाला दिले आहे

Back to top button