शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काळीमा फासणाऱ्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय ?

वाढ होतेय ?
जीवनामध्ये वाटचाल करत असताना शिक्षण अध्यात्म सहकार व्यावसाय अशा
प्रकारच्या अनेक क्षेत्रातून मार्गक्रमण कराव लागते माणसाला माणूस
म्हणून जगण्यासाठी मुळातच संस्काराची गरज असते आणि हे संस्कार प्रथम
आपल्या कुटुंबातील व्यक्तीकडून कळत नकळत मिळत असतात जाणून-बुजून
सुसंस्कृत घडविण्यासाठी शिक्षणाचा आधार घ्यावा लागतो भारतरत्न डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिक्षण
घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे प्रत्येक जण शिक्षण
घेण्याकडे वाटचाल करू लागला शिक्षणाची वेगवेगळी स्थितीज पादाक्रांत
करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊ लागला मग त्यामध्ये विद्यार्थी असेल
विद्यार्थिनी असेल मार्गदर्शन करणारे शिक्षक असतील सर्व परीने आर्थिक आणि
संस्काराची धुरा सांभाळणारे कुटुंब असेल आणि मनुष्य हा समाजभिमुख प्राणी
आहे त्याला आकार देण्याचं काम समाजातला प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीने
करण्याचा प्रयत्न करत असतो पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून दिले
जाणार शिक्षण संस्कार अध्यात्मिक संस्कार हे खूप उत्तमरीत्या दिले जायचे
माणूस म्हणून कसं जगाव माणूस म्हणून कसं वागाव माणसाने माणसाशी
संवादाच्या माध्यमातून कसं जोडलं जावं उन्नती प्रगती या सगळ्या गोष्टी
सामूहिक दृष्टिकोनातून शिकविल्या जायच्या कालांतराने शिक्षण पद्धतीमध्ये
बदल झाले शाळा महाविद्यालयांची निर्मिती झाली अभ्यासक्रम तयार झाले
शिक्षणाकडे सर्वांचा ओढा वाढला आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये
स्पर्धाही वाढली आणि आजकाल प्रत्येक जण म्हणतो की हे स्पर्धेचे युग आहे
आणि ह्या युगामध्ये टिकायचं असेल तर दर्जेदार शिक्षण मेहनत या सगळ्या
गोष्टी अवगत असल्या पाहिजेत मिळाल्या पाहिजेत घेतल्या पाहिजेत आणि या
सगळ्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला वाटायला लागलं की मी डॉक्टर व्हावं मी
इंजिनियर व्हावं मी कलेक्टर व्हावं आणखी मी काहीतरी मोठा अधिकारी व्हावं
आणि याहीपेक्षा जास्त अपेक्षा जे मी करू शकलो नाही जे मला मिळालं नाही ते
माझ्या मुलाने मुलीने करावं पालकांच्या अशा अपेक्षा वाढलेल्या सर्वत्र
दिसून येतात शाळा महाविद्यालयातून सर्व काही बाजारीकरण पांढरपेशी
भ्रष्टाचार वाढल्यामुळे त्याला पर्याय म्हणून खाजगी क्लासेसची निर्मिती
झाली त्या निर्मितीतून सुरुवातीला गुणवत्तेला वाव मिळत होता कालांतराने
त्याही क्षेत्रांमध्ये अनेक जण उतरले स्पर्धा निर्माण केली वाम मार्गाचा
अवलंब करून आपल्या खाजगी क्लासेसची जाहिरात प्रत्येकाच्या मनावर
बिंबविण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला अनेक जण क्लासेस वाले गोरगरिबांसाठी
मोफत ट्युशनच्या नवीन नवीन योजना काढू लागले त्याचेच बळी पडणारे
सर्वसामान्य घरोघरी कुटुंबातील मुलींना अलीकडच्या काळात अनेक शाळा
महाविद्यालय आणि अशा प्रकारची खाजगी क्लासेस हे वेगळ्या पद्धतीने त्यांना
ट्रीट करून त्यांचा कसा गैरफायदा घेऊन गैरवापर करता येईल अशी कृत्य त्या
ठिकाणी या महाराष्ट्रात या देशात वाढलेली आपणाला दिसतात परंतु अशा
पद्धतीची शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी कृत्य करणारे हे तेवढ्या
कालावधी पुरतं करत नाहीत तर त्यांचं हे काम अनेक वर्षापासून चालू
असल्याचे चित्र अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपणांसमोर आलेलं आहे तसाच एक
प्रकार नुकताच बीड शहरातील उमाकिरण या खाजगी क्लासेस शाळा च्या
माध्यमातून एका सतरा वर्षीय गरीब कुटुंबातील मुलीचं लैंगिक शोषण विनयभंग
यासारखे दुष्कृत्य करून महाराष्ट्रात नव्हे तर देशात शिक्षणाक्षेत्राला
काळीमा फासून खळबळ उडवून दिली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन केंद्र शासन
जागृत होऊन या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा प्रयत्न करताना दिसत
आहे आरोपींना अटक झाली आहे आणि या आरोपींना जे राजकीय वरद असतं
पडद्याआडवून पाठबळ देत आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे मग त्या
ठिकाणचा आमदार असो त्या ठिकाणचा खासदार असो किंवा एखाद्या सामाजिक
आंदोलनाचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता असो त्या प्रत्येकाची चौकशी केली
पाहिजे त्यांचे फोन कॉल डिटेल्स तपासले पाहिजे जर दोषी आढळले तर
त्यांनाही त्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा
दुष्कृत्य करणाऱ्याला राजकीय आश्रय पाठबळ कोणीही देण्याचा प्रयत्न करणार
नाही आणि ते निरडावलेले आरोपी पैशाच्या जोरावर मात चढलेले फीस जास्त
घ्यायची आणि पावती कमी पैशाची द्यायची याचा अर्थ शासनाचा टॅक्स सुद्धा
चोरायचा आणि अशा पद्धतीने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना लुटून
शासनाची ही फसवणूक करायची हा असा दुहेरी भ्रष्टाचार आणि दुराचार करणारे
महाभाग या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असतील तर विद्यार्थ्यांचे
विद्यार्थिनींचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे याला एकच पर्याय पूर्वी शाळा
महाविद्यालयातून दिले जाणार शिक्षण फक्त आणि फक्त तेच शिक्षक असायचे आता
शाळा महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो आणि दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत
खाजगी क्लासेस कडे पालक भरमसाठ फीस भरून आपले पाल्य पाठवतात त्या
पाठवणाऱ्या पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण जागृत राहिले पाहिजे
आपल्या पाल्याची सुरक्षा त्या क्लासेस मध्ये काय आहे त्या क्लासेस मध्ये
संचालकापासून सेवकापर्यंत कशा पद्धतीची लोकं काम करतायेत हाही पडताळा
घेतला पाहिजे आणि ही घेत असतानाच त्या ठिकाणी खरोखरच ट्युशनची गरज आहे का
का फॅशन म्हणून ट्युशन लावायची किंवा इतरांनी केलं म्हणून मी करायचं या
भूमिकेतून या सगळ्या गोष्टी होत आहेत का? हाही विचार करणं गरजेचे आहे
गोरगरीब विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने पिळवणूक खाजगी क्लासेस शाळा
महाविद्यालयातून होत असेल तर त्या ठिकाणी शासनाकडून कडक निर्बंध घातले
पाहिजेत आचारसंहिता तयार करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे
त्यावर देखरेख करण्यासाठी एखादी शासकीय समिती नेमली पाहिजे आणि त्या
माध्यमातून या सगळ्या खाजगी शिक्षण क्षेत्रावर नजर ठेवली पाहिजे
एका बाजूला लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजेत परस्त्री माते समान आहे
आणि तिचा सन्मान वेळच्या वेळेला केला पाहिजे त्याचबरोबर स्त्रियांनी
सुद्धा आपण स्वतःला कमी न समजता फक्त सुसंस्कृत पद्धतीने प्रत्येक
प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे असं
म्हणतात न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड प्रत्येकाला असली पाहिजे म्हणजे
आपण प्रत्येकानी न्याय भूमिकेतून जीवन जगले पाहिजे कोणावरही आपल्याकडून
अन्याय होणार नाही अत्याचार होणार नाही हे वागताना ठरवलं पाहिजे आणि ते
अमलात आणलं पाहिजे तर अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाही फक्त बीडच हेच
प्रकरण नाही तर राज्यामध्ये देशांमध्ये अशा पद्धतीची अनेक प्रकरण घडतात
ती प्रकरण आठ पंधरा दिवस महिनाभर प्रत्येक जण गांभीर्याने त्यावर विचार
करतो प्रतिक्रिया देतो आणि कालांतराने त्याचा विसर पडतो असा विसर पडता
कामा नये एखाद्या प्रसंगातून धडा घेतला पाहिजे आणि त्या धड्याखाली
प्रत्येक बाबीची उत्तर शोधून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे तरच हे
कुठेतरी थांबेल आणि यामध्ये फार मोठा शासनाचा सहभाग पाहिजे कारण
भारतीयांना कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी त्याच पद्धतीने केली तर
शिस्त लागते असा आतापर्यंतचा अनुभव आहे स्वयसिस्तीने वागणारी माणसं फार
कमी टक्केवारी आहे त्यामुळे या लोकशाहीच्या माध्यमातून जर प्रत्येकाला
जीवन जगायचं असेल तर प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळलीच पाहिजे
मुलींनो रणरागिनी बना
मुलींनी स्वतःला कोणत्याही पद्धतीने कमी न समजता आपल्यासमोर शूर माता
जिजाऊ आपल्यासमोर राणी लक्ष्मीबाई आपल्यासमोर सध्याच्या माजी आयपीएस
अधिकारी आणि माजी राज्यपाल किरण बेदी अशा अनेक शूर महिलांच्या बाबतीमध्ये
आपल्या डोळ्यासमोर वैचारिक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये असणाऱ्या
हिमतीच्या दृष्टिकोनातून त्यांचं चित्र डोळ्यासमोर ठेवून महिला हि
रणरागिणी असते आणि ती एकदा अन्यायाविरुद्ध चिडून उठली तर पुढच्याला
बेचिराख केल्याशिवाय राहत नाही ही भूमिका मुलींमध्ये असली पाहिजे अन्याय
करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो असं डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर सांगतात हाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ज्या ठिकाणी बॅड टच
गुड टच हा आता प्री प्रायमरी ला सुद्धा शिकविला जातो आणि आपणाला ते कळलं
पाहिजे आणि जर समजा बॅड टच् च्या माध्यमातून जर कोणी आपल्या जवळचा किंवा
त्या ठिकाणी शिक्षक असो की कोणीही असो तो ओळखता आला पाहिजे त्याचबरोबर
त्याची डोळ्याची नजर ओळखता आली पाहिजे आणि ओळखल्यानंतर स्वतः त्याबाबत
तात्काळ आपल्या पालकांशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी ते शेअर केले
पाहिजे बोललं पाहिजे आणि वेळप्रसंगी त्याच्यावर कठोर कारवाई
करण्यासंदर्भात पाऊल उचलला पाहिजे जर तुम्ही ते सहन करत बसलात तर तुम्ही
आज त्यांच्या शिकार झालेल्या आहात भविष्यात अनेकांना तो शिकार बनवेल आणि
त्या अनेकांना शिकार बनवण्यापासून तुम्हीच वाचू शकता त्यामुळे मुलींनो
रणरागिणी बना हम किसीसे कम नही हमारे उपर टेडी नजर करने वाले की आखे हम
निकाल देंगे अशी खूणगाट तुमच्या मनाशी बांधा आणि पुढे जीवनात वाटचाल करा
रडण्यापेक्षा लढणं हेच जीवनाचं सार आहे आणि अनेक जण जन्माला येतात आणि
त्यांचा मृत्यू होतो पण आले आणि गेली त्यांच्या हातून काहीच झालेलं नसतं
खायला कहार भुईला भार काय उपयोगाचं हे पण लक्षात ठेवा त्यामुळे शासनाने
समाजाने अशा दुष्कृत्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातल्या असो किंवा
कोणत्याही क्षेत्रातले असो त्या संबंधित व्यक्तीला भर चौकामध्ये फाशी
दिली पाहिजे तशा पद्धतीचा कायदा केलाच पाहिजे या गत सरकारने फोकसो कायदा
केलेला आहे त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे तरच तो
कायदा कायद्याचा धाक दाखवेल असं वाटतं
मुलींनो अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध पेटती मशाल हातात घेऊन त्या
अन्याय करणाऱ्याला अत्याचार करणाऱ्याला या पेठत्या मशालीने कोणत्या
बाजूने आग लावायची हे तुमच्या हातात आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये
तुमच्या मनगटामध्ये शूर महिलांची ताकद सदैव ठेवली पाहिजे आणि अशा
अन्यायात्याचारी भस्मासुराला खाक करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण हो
हीच अपेक्षा
पालकांनो आपल्या मुला-मुलींना स्वतःच्या अवास्तव अपेक्षा आशा पूर्ण
करण्यासाठी त्यांच्या मागे तगादा लावू नका त्यांचा बुद्ध्यांक त्यांची
आवड त्यांची क्षमता याचा अंदाज घ्या आणि अंदाज घेऊनच त्यांना ज्या
क्षेत्रांमध्ये आवड आहे काम करण्याची क्षमता आहे त्या क्षमतेनुसार
त्यांना मार्ग क्रमांक करू द्या आणि याउलट मुलांनो मुलींनो तुम्ही
दुसऱ्यांनी कुणी काहीतरी केलं म्हणून मीही तेच करावं अशा पद्धती ची
भूमिका आपल्या मनामध्ये तयार करू नका समाजात वावरत असताना पालकांची इज्जत
जाणार नाही समाजामध्ये मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीचं कृत्य
आपणाकडून होणार नाही याची दक्षता नक्कीच घ्या आणि भविष्य उज्वल
करण्यासाठी शिक्षणाबरोबरच सामर्थ्यवान बना हीच सदिच्छा
लेखक
प्राचार्य डॉ खुशाल मुंढे
शिक्षणतज्ञ तथा शैक्षणिक सामाजिक चळवळीचे अभ्यासक
मोबाईल 98 22 22 62 15



