कोरोना अपडेटदेशविदेशमहाराष्ट्र

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला मिळणार 4 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळणार

केंद्र सरकारचा निर्णय; भाजपचे युवा नेते बालाजी पवार यांची माहिती


बीड (प्रतिनिधी)

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसाला/परिवाराला 4 लाख रुपये मदत देण्याचे आदेश मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत अशी माहिती भाजपचे युवा नेते बालाजी पवार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. केंद्र सरकारने गृह विभागाच्या संजीवकुमार जिंदाल, संयुक्त सचिव, भारत सरकार यांच्या सहीने असा आदेश पारित केला असल्याचे बालाजी पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.


पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना या महामारीनेे संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात हाहाकार माजवला असून अनेक कुटूंबे या महामारीने उध्वस्त झाली आहेत, अनेक घर बेघर झाली आहे कोणाचे आई वडील गेले तर कोणाच्या घरातील तरुण मुलगा गेला. मुलांचे शिक्षण शिकवणे, पालनपोषण करणे अवघड होवून बसले आहे. या सर्वांना आर्थिक आधार म्हणून केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या व कोरोना आजार होवून बरे झालेल्यांना सुद्धा दवाखान्याचा खर्च मिळणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

संबंधीत योजनेचे सर्व कागदपत्रे जसे की, त्या कागदपत्रात मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड व कोरोनाने बरे होवून हॉस्पीटलला घेतलेल्या उपचाराचे बिलं यांचा समावेश आहे हे कागदपत्रे आणि योजनेचा फॉर्म जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे दाखल करावयाचे आहेत. या सर्व योजनेचे फॉर्म लाभार्थ्यांना मिळण्यासाठी बालाजी पवार मदत केंद्र चालू केले असून त्यांना प्रत्यक्ष भेटून किंवा मो.नं.9260007000 , 9209009000 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बालाजी पवार यांनी केले आहे.

 

 

Back to top button