बीडब्रेकिंगसंपादकीय

छोटेवाडी ग्रामपंचायत कडून १०० झाडांची वृक्षलागवड सरपंच अंगद कटके यांचा उपक्रम

बीड (प्रतिनिधी)

माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी ग्रामपंचायतने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून (ता.५) गावातील प्रत्येक घरासमोर एक झाड, असा उपक्रम राबवित शंभर झाडे लावली आहेत. सरपंच अंगद कटके यांच्या उपक्रमातून राबविण्यात आलेल्या वृक्षरोपणाने आगामी काळात गाव हिरवंगार होणार आहे. या मोहिमेची सुरुवात माजी सरपंच निलाबाई उघडे, किसन उघडे या दाम्पत्याच्या हस्ते पहिले झाड लावून करण्यात आली. सरपंच अंगद कटके यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे छोटेवाडी ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आजघडीला कोरोनासारख्या महामारीने अवघे जग हैराण आहे. या कोरोना महामारीमुळे ऑक्सिजनचे महत्व किती आहे, याची आत्ता प्रत्येकाला जाणीव झालेली आहे. केवळ ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक घरासमोर एकतरी झाड असणे गरजेचे आहे. जेणेकरून गावाला शुद्ध व नैसर्गिक हवा मिळेल. हा दृष्ठीकोन डोळ्यासमोर ठेवून सरपंच अंगद कटके यांनी गावात १०० झाडे लावली आहेत. यावेळी उपसरपंच रोशनकुमार राठोड, ग्रामसेवक जे.के.शेख, ऍड.सुरेश पौळ, भीमराव दळवी, गोरख दळवी, अंबादास दळवी, मारोती गायकवाड, भागवत इंगळे, सर्जेराव कटके यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Back to top button