📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ५७७ कोटी रुपयाचे पॅकेज

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ५७७ कोटी रुपयाचे पॅके
================
 आ. विजयसिंह पंडित यांनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार
================
गेवराई दि. १६(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांसाठी ५७७ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पॅकेज जाहीर करून दिवाळी भेट दिली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होणार असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत त्यांनी दोन दिवसात ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. विशेषत: गेवराई तालुक्यात गोदावरी आणि सिंदफना नदीमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या तर अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांंनी बीड जिल्ह्याचा दौरा करुन शेतकऱ्यांचे अश्रू पुसले होते. यावेळी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्व परिस्थिती गंभीरतेने मांडली होती, त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी करुन अतिवृष्टी बाधित बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५७७ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून आ.विजयसिंह पंडित यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करून दिवाळीची भेट दिली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा होणार असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत त्यांनी दोन दिवसात ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
Back to top button