महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम समाजासाठी आदर्श – प्रणाली कुलकर्णी

महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम समाजासाठी आदर्श – प्रणाली कुलकर्णी
रक्तदान शिबिरामध्ये १११ रक्तदात्यांचे योगदान
जामखेड प्रतिनिधी – महिला शिवजन्मोत्सव समिती ही केवळ जामखेड शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करणारी संस्था ठरत आहे. महिला शिवजन्मोत्सव समितीचा उपक्रम समाजासाठी आदर्श असून
मातृशक्तीच्या पुढाकारातून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे, ही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अनेकदा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या रक्तदान करू शकत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत हिमोग्लोबिन वाढवून समाजासाठी रक्तदान करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन प्रणाली कुलकर्णी यांनी केले.
आज दिनांक ६ मार्च २०२६ रोजी जामखेड येथे महिला शिवजन्मोत्सव समिती जामखेड आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रणाली कुलकर्णी (नगर दक्षता, कार्यवाहीका) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पुढील काळात रक्तदान शिबिरांबरोबरच तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून महिला भगिनींची हिमोग्लोबिन तपासणी घरोघरी जाऊन केली पाहिजे. कारण अनेक महिलांना घरातील जबाबदाऱ्या आणि संसाराच्या ओझ्यामुळे अशा शिबिरांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. आजच्या काळात महिला सशक्त असेल तर संपूर्ण कुटुंब सशक्त होते, त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
यावेळी खर्डा गावच्या सरपंच संजीवनी पाटील, संजय काशिद, डॉ.संजय राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून सिमा गायकवाड ,छगन क्षिरसागर,खर्डा गावच्या सरपंच संजीवनी पाटील , महिला शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्षा रोहिणी काशिद तसेच जेष्ठ नेते मधुकर राळेभात,शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी,उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,गटनेते तात्याराम पोकळे, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, मोहन (मामा) गडदे, सागर सदाफुले,शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना,अर्जुन म्हेत्रे,प्रवीण होळकर,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण,विश्व हिंदू परिषदेचे विवेक कुलकर्णी,डाॅ.संजय राऊत, डॉ.अशोक बांगर, डॉ.सुशिल पन्हाळकर, डॉ.वैभव तांदळे,डॉ.पांडुरंग सानप,दादा अंदुरे ,शिक्षक नेते नारायण राऊत, विकास बगाडे,जुबेर पठाण,अशोक जावळे, मनोज भोरे,संजय बेलेकर, भैय्या राळेभात,बालाजी आजबे,शरद सायकर,किरण मुळे,ऋषिकेश मोरे, शिवकुमार डोंगरे, दत्तात्रय अष्टेकर, नितीन शास्त्रकार, विजय राजकर,मनोज इंगळे, जयदीप वेदपाठक, विशाल नेटके आदी मान्यवर व रक्तदाते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यास प्रमाणपत्र व ट्रॅकसूट देण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य जामखेड ब्लड स्टोरेज चे संचालक विकास जरे आदी डॉक्टरांनी केले.या रक्तदान शिबिरासाठी १११ रक्तदात्यांचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब प्रतिष्ठानचे महेश निमोणकर, राजमुद्रा युवा मंचचे सुरज काळे,अवि बेलेकर,अजय गौड,संतोष शिंदे, स्वप्नील लोळगे, कृष्णा अष्टेकर,विराज फुटाणे, विलास विटकर, महादेव पवार, विशाल सोनार,शरद सायकर,उमेश फाटे, उमेश जाधव,पवन आजबे,बालाजी आजबे,शिवराज बोराटे, गणेश घोलप,दिपक सुरसे,विशाल निमोणकर, युवराज उबाळे,साहिल कांबळे,आदित्य साळुंके,ओंकार काशिद,अनुप झगडे,प्रथमेश झगडे,अनिकेत झगडे,बाळू जावळे,ऋषिकेश झगडे तेजस म्हेत्रे,अनिकेत कानडे,रुद्रा काशिद आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव कोल्हे यांनी केले
तर आभारप्रदर्शन भाजपा शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद यांनी मानले.



