बीड

वयाच्या पाचव्या वर्षी महमंद कुरेशीचा पहिला रोजा

वयाच्या पाचव्या वर्षी महमंद कुरेशीचा पहिला रोजा

जामखेड प्रतिनिधी – रमजान महिना
हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो, या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात. इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना १९ फेब्रुवारीपासून सुरू झाला. जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्यात आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचा संदेश देतात. जामखेड येथील वसीम कुरेशी यांचे चिरंजीव महंमद वसीम कुरेशी याच्या वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण करून भक्ती आणि संस्कारांचा सुंदर आदर्श घालून दिला. एवढ्या लहान वयात दाखवलेली जिद्द, श्रद्धा पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही महंमदचे कौतुक केले.

कडक उन्हाची चाहूल लागलेली असताना चिमुकल्या महंमदने कोणतीही तक्रार न करता उत्साहाने आपला पहिला रोजा पूर्ण केला. इतक्या लहान वयात त्याने दाखवलेली चिकाटी व भक्ती पाहून उपस्थित सर्व जण भारावून गेले. संध्याकाळी रोजा सोडण्याच्या (इफ्तार) वेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत छोटेखानी सर्व मौलवीना जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .विविध फळे, स्वादिष्ट पक्वान्न व आनंदमय वातावरणात महंमदचा फुलांच्या माळांनी सत्कार करण्यात आला. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल कुरेशी कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Back to top button